विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Manohar Joshi उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली होती बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भारतरत्न किताबाची मागणी, पण प्रत्यक्षात मोदी सरकारने दिला बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पद्मभूषण सन्मान!!
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म सन्मानांमध्ये पद्मभूषणच्या यादीमध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नाव आले. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याबद्दल सरकारने त्यांना पद्मभूषण किताबाने गौरवले. हे तेच मनोहर जोशी होते, ज्यांनी लोकसभा सभापती पदाच्या कालावधीत व्यक्तीशः पुढाकार घेऊन संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैलचित्र अनावरित करून घेतले होते. त्यांनी कायम बाळासाहेब ठाकरे यांना मनापासून साथ दिली होती.
10 आमदारांच्या बळावर विरोधी पक्षनेते पदासाठी पवारांचा “मोठ्ठा डाव”; पण ठाकरे + काँग्रेसला पटतचं नाय!!
परंतु, उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरील जाहीर सभेत व्यासपीठावरून खाली उतरवून मनोहर जोशींचा अपमान केला होता. शिवसेनेने त्यांच्यासाठी कुठला किताब मागितलेला नव्हता, तरीदेखील मनोहर जोशींच्या राजकीय आणि सामाजिक कामगिरीची दखल घेऊन मोदी सरकारने त्यांना पद्मभूषण किताबाने गौरविले.
बाकीच्या पद्म पुरस्कारांमध्ये अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, अशोक सराफ, चैत्राम पवार आदींना सरकारने पद्मश्री किताब जाहीर केला आहे.
त्याचबरोबर सुझुकी मोटर्सचे सुझुकी यांना पद्मविभूषण, तर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना पद्मभूषण किताबाने गौरविले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App