विशेष प्रतिनिधी
मुंबई : घरोघरी लसीकरण मोहिमेला अखेर मुंबईत ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयात याबाबत मार्गदर्शक तत्त्वांचा अंतिम मसुदा तयार असल्याची माहिती दिली.Doorstep vaccination will start in Mumabi
मुंबई महापालिकेकडे घरोघरी लसीकरण करण्यासाठी आतापर्यंत ३५०५ नागरिकांची नोंदणी झाली आहे. राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करून ही मोहीम असणार आहे, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले. जे नागरिक पूर्णतः अंथरुणाला खिळून आहेत आणि हलू शकत नाहीत, दुर्धर आजार आहे, त्यांना घरी जाऊन लस देण्यात येईल.
मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. घरोघरी लसीकरणासाठी राज्य सरकारचे धोरण निश्चित झाले आहे.
न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार ते असून लवकरच अंतिम करणार आहे, असे कुंभकोणी यांनी सांगितले. प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम पुण्यातून सुरू होणार होती; मात्र मुंबईमध्ये अधिक प्रतिसाद मिळाल्यामुळे १ आॅगस्टपासून मुंबई महापालिका क्षेत्रात ही मोहीम सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावर खंडपीठाने समाधान व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App