राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊ नका, जगनमोहन रेड्डी यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांची हेमंत सोरेन यांच्यावर टीकेची झोड


मतभेद असतील पण राजकारण इतक्या खालच्या पातळीला नेऊ नका की आपला देश दुर्बल होईल, अशा शब्दांत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना खडसावले आहे. Don’t take politics to such a low level, many Chief Ministers including Jaganmohan Reddy criticize hemant Soren


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मतभेद असतील पण राजकारण इतक्या खालच्या पातळीला नेऊ नका की आपला देश दुर्बल होईल, अशा शब्दांत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना खडसावले आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विटरवर म्हटले होते की आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. त्यांनी फक्त त्यांच्या मन की बात केली. पण त्या ऐवजी काम की बात केली असती आणि ऐकलीही असती तर बरं झालं असत. सोरेन यांच्या ट्विटला उत्तर देताना जगनमोहन यांनी म्हटले आहे की, हेमंत सोरेन एक भाऊ म्हणून तुम्हाला सल्ला देतो की आपले अनेक मतभेद असतील. पण या पध्दतीने राजकारणात खालच्या पातळीवर उतरण्याने आपल्याच देशाला दुर्बल बनवित आहोत. कोरोनाविरुध्दच्या या लढ्यात एकमेंकांवर बोट दाखवून चालणार नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन पंतप्रधानांचे हात मजबूत केले पाहिजेत.केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पंतप्रधान मोदींशी नव्हे तर करोनाशी लढा असा सल्ला हेमंत सोरेन यांना दिला आहे. डॉ. हर्षवर्धन म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांविषयी विधान करताना त्यांनी हे विसरू नये की, केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने ही साथीची रोगाची समस्या सोडविली पाहिजे, आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करताना पंतप्रधान मोदींवर रोष व्यक्त करणे चुकीचे आहे. करोना संकटात केंद्र सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी तिजोरी उघडली असताना झारखंड सरकारने आपली तिजोरी बंद ठेवली आहे. हेमंत सोरेन यांना वाटतं की सगळी कामं केंद्रानेच करावीत. करोनासोबत लढा पंतप्रधानांशी नाही.

आसामचे ज्येष्ठ मंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनीही सोरेन यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. तुमचं हे ट्विट केवळ हीन दजार्चं नाही तर जनतेच्या पीडेचंही हसू उडवणं आहे ज्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांनी फोन केला होता. मुख्यमंत्रीपदाची गरिमा आपल्यासारख्यांमुळे ढासळत आहे.

संवैधानिक पदाची पातळी एवढ्या खालवर जाऊ देऊ नका. आपण टीम इंडिया आहोत, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलंय. नागालँडचे मुख्यमंत्री नेफी रियो यांनी लिहिलंय, ‘मुख्यमंत्री म्हणून अनेक वर्षांच्या कार्यकाळा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांप्रती संवेदनशील असल्याचं मी अनुभवलंय. मी हेमंत सोरेन यांच्या वक्तव्याशी सहमत नाही.

आपल्याला नरेंद्र मोदींसारखा जबाबदार पंतप्रधान मिळाला म्हणून आम्ही भाग्यशाली आहोत,असे मिझोरमचे मुख्यमंत्री झोराम थांगा यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

Don’t take politics to such a low level, many Chief Ministers including Jaganmohan Reddy criticize hemant Soren

महत्वाच्या  बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात