पंजाब आणि भारत यांच्यात सीमारेषा आखू नका; मुख्यमंत्री भगवंत मान यांची फुटीरतावादी भाषा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमांवर शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन पुकारण्यासाठी जमत असताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या तोंडी फुटीरतावादी भाषा आली आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पंजाब आणि भारत यांच्यात सीमारेषा आखू नका. शेतकऱ्यांची बोला, असे भगवंत मान म्हणाले आहेत.Don’t erect a border between Punjab and India, talk to farmers: CM Mann to Centre



पंजाब मधले शेतकरी आंदोलनकर्ते दिल्लीची कोंडी करू नयेत यासाठी हरियाणा सरकारने काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. मात्र या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजेच पंजाब आणि भारत यांच्यातली सीमारेषा आहे, असा गैरसमज भगवंत मान यांनी पसरवला. हरियाणा सरकार शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ठिकठिकाणी कुंपण घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. पण मूळात भगवंत मान यांच्यासारख्या भारतीय राज्यघटनेची शपथ घेऊन मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या नेत्याच्या तोंडी आलेल्या वक्तव्यातून भारत आणि पंजाब हे दोन वेगवेगळे देश असल्याचेच सूचित झाले.

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र, ते आंदोलन वेगवेगळ्या फुटीरतावादी शक्तींनी हायजॅक केले होते. केंद्रातील मोदी सरकारने अखेरीस फुटीरतावादी शक्तींना संधी मिळू नये म्हणून कृषी कायदे मागे घेतले. पण फुटीरतावादी शक्तींचे समाधान झाले नाही. त्यांनी वेगवेगळे फंडे वापरून मोदी सरकारला नामहरण करण्याचे धोरण अवलंबले.

16 फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी बंद पुकारला आहे. त्याच वेळी दिल्लीची पुन्हा एकदा कोंडी करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे. पंतप्रधानांचे आणि गृहमंत्र्यांचे निवासस्थान घेण्याचा त्यांचा इरादा असल्याचे गुप्तचर खात्याच्या अहवालात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी भारत आणि पंजाब यांच्यात सीमारेषा आखू नका, अशी फुटीरतावादी भाषा वापरून शेतकरी आंदोलनाच्या संभाव्य आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.

Don’t erect a border between Punjab and India, talk to farmers: CM Mann to Centre

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात