वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : कोरोनाचा ओमायक्रोन या विषाणूवर सध्याची लस प्रभावी असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला असून तो डेल्टा या विषाणूचा तुलनेत जास्त तीव्र नसल्याचे म्हंटले आहे. Don’t be intimidated by the omicron; The current vaccine is effective; Claims to be milder than Delta
कोरोनाचा ओमायक्रोनचा प्रसार अनेक देशात झाला असून अनेकांना त्याची लागण झाली आहे. परंतु, लागण झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी आहे. हा विषाणू कोरोनाच्या डेल्टापेक्षा सौम्य आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र लागण होऊ नये म्हणून काळजी घेण्याची अतिशय गरज आहे.
कोरोना नियंत्रणात आला म्हणून सर्व नियम आता पाळण्याची गरज नाही, असे समजून वागू नका. कोरोना नियमावलीचे पालन करा. कोरोना संपलेला नाही. तो ओमायक्रोन स्वरूपात परत आला आहे. पण, कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा अधिक सौम्य आहे.
कोरोनाविरोधी लस या ओमायक्रोन विषाणूसाठी प्रभावी असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक मायकेल रेयना यांनी केला आहे. त्यामुळे लसीकरण हाच सध्या उपाय आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे आणि भावी संकटा पासून स्वतः ला वाचविण्याची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App