वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आज पुन्हा वाढ केली. त्यामुळे विना अनुदानीत गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. तर हे नवे दर सोमवार रात्रीपासून लागू होणार आहेत. Domestic gas cylinders go up by Rs 25, rise again after one month; The new rates will come into effect from Monday
वाढलेल्या किमतींमुळे राजधानी नवी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता८५९.५० रुपयांवर पोचले आहेत. या अगोदर १ जुलैला सिलेंडरचे दरात २५.५० रुपयांनी वाढ झाली होती. एकंदर या वर्षी घरगुती सिलेंडरच्या किंमतीत १६५ रुपयांची वाढ झाली आहे.
जून महिन्यात दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत किंमत ८०९ रुपये होती. त्यानंतर १ जुलैला सिलेंडरचे दरात वाढ होत किंमत ८३४ रुपये झाली. दरम्यान १ जानेवारीपासून आजपर्यंतच्या दर बघितले तर गेल्या आठ महिन्यात सिलेंडरच्या किंमतीत १६५ रुपयांची वाढ झाली आहे.
देशातील मुख्य शहरातील सिलेंडरचे दर
दिल्लीव्यतिरिक्त आजपासून कोलकातामध्ये सिलेंडर ८८६ रुपयांना विकण्यात येणार आहे. तर मुंबईत सिलेंडरची किंमत ८५९.५० रुपये असणार आहे. लखनौमध्ये किमती ८९७.५० रुपयांवर पोचल्या आहेत.
घरगुती गॅससोबतच १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दरही ६८ रुपयांनी वाढलेत. यापूर्वी १ जुलैला तेल कंपन्यांनी गॅसचे दर २५ रुपयांनी वाढवले होते. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत
राज्यांचे कर वेगळे असल्याने दरात फरक
तेल कंपन्या घरगुती सिलेंडरच्या किंमतीची दर महिन्याला नोंद ठेवते आणि त्यानंतर किंमत वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेते. प्रत्येक राज्यात टॅक्स वेगवेगळा असल्याने सिलेंडरच्या दर कमी जास्त बघायला मिळतात. .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App