कुत्रा हा इमानदारच प्राणी! जवानाला दहशतवाद्यांपासून वाचवण्यासाठी डॉग केंटने दिले बलिदान

लष्कराने व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिला उजाळा

विशेष प्रतिनिधी

कुत्रा हा जगातील सर्वात जास्त इमानदार प्राणी असल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. तसेच  कुत्रा हा हुशार प्राणीही आहे.  त्यामुळे लष्कराच्या  दहशतवाद  विरोधी अथवा बॉम्बोशोधक  मोहिमांमध्ये श्वान पथकाची मोठी मदत होत असते. या श्वान पथकाच्या कामगिरींचा इतिहासहा मोठा आहे. दसम्यान, नुकताच एका लष्करी कारवाईत याचा  प्रत्यय आला आहे. दहशतवाद्याच्या हल्ल्यापासून आपल्या हँडलरला वाचवण्यासाठी एका श्वानाने बलिदान दिले आहे.  Dog Kent sacrificed himself to save the jawan from terrorists

केंट या कुत्र्याने दहशतवादी चकमकीत आपल्या हँडलरला वाचवण्यासाठी आपला जीव दिला. या शूर केंट डॉगला लष्कराकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यासोबतच भारतीय लष्करानेही एका व्हिडिओद्वारे या धाडसी श्वानाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मंगळवारी, सहा वर्षीय लॅब्राडोर जातीची केंट जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये शोध मोहिमेदरम्यान सैनिकांच्या गटाचे नेतृत्व करत असताना दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळीबार केला. यावेळी केंटने आपला जीव धोक्यात घालून आपल्या हँडलरला गोळ्यांपासून वाचवले.

व्हिडिओमध्ये केंट एका घुसखोराचा शोध घेत आहे आणि सैनिकांचा एक गट जंगलाजवळच्या दाट झुडपात तिच्या पाठोपाठ जाताना  दिसत आहे. ती दहशतवाद्यांचा माग  काढते आणि अधिकाऱ्यांना त्वरीत उंच झुडपांच्या तुकड्याकडे घेऊन जाते. घुसखोर हात हवेत घेऊन बाहेर येताच, केंट भुंकते आणि सैनिकांना सावध करते. केंट त्या दहशतवाद्यावर झडप मारते यानंतर सैनिकांनी त्याला घेरतात आणि त्यानंतर  ती तिच्या हँडलरकडे धावते. या कारवाई तिने  देशासाठी आपला जीव गमावला आहे.

Dog Kent sacrificed himself to save the jawan from terrorists

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात