विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोक कोणाला मतदान करतात, हे समजून घ्या. लोकसभेच्या निवडणुकीचे जाऊ द्या. आपलं फेसबुक लाईव्ह नसते डायरेक्ट फेस टू फेस काम असते. काम करणाऱ्या लोकांनाच लोक मतदान करतात, आता ताक देखील फुंकून प्यायचे आहे. एकदा मार बसला, पण विरोधकांचा खोटा प्रचार मोडून काढायचा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते.Do not ignore the assembly, break the false propaganda of the opposition, instructions to the office bearers of Chief Minister Shinde’s Grand Alliance
देवेंद्रजी माझ्या पाठिशी उभे राहिले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राने मोठा उठाव पाहिला. दोन वर्षे झाली त्याला आता धाडसी निर्णय घेतला. महायुतीचे सरकार स्थापन केले. 50 लोक सोबत होते, हजारो लाखो शिवसैनिक सोबत आले. देवेंद्रजी यांनी मला सहकार्य लाभले. बाळासाहेबांचे व दिघे साहेबांचे विचार सोबत होते. मोदी-शहा आमच्या पाठिशी उभे राहिले आहेत.
सर्व कामावरील ब्रेक उठवले
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, सर्व कामे ठप्प होती. पण महायुतीचे सरकार आल्यानंतर त्याला ब्रेक उठवले. एकच चालू होते फेसबुक आणि वर्क फॉर्म होम सुरू होते. सरकार आल्यानंतर गोविंदा आला जोरदार साजरा केले. विकासाबरोबरच संस्कृती व परंपरा जोपासण्याला सुरूवात झाला. राज्यातील भविष्य उज्जल कऱण्याचा ध्यास घेतला आहे. तुम्ही सर्व आहात ही सर्व सरकारची ताकद आहे.
एकजूट दाखवण्याची गरज आहे. हे काम करणारे सरकार आहे. 27 बाय 7 हे सर्कल चालू आहे. कधीही काम करताना चालू करतात. प्रधानमंत्री महोदयांनी शिक्कामोर्तब केला आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. गोरगरीबांचे आहे युवकांचे वारकऱ्यांचे सरकार आहे. वैयक्तिक लाभाचा निर्णय कधीही घेतला नाही. वैयक्तिक काहीही नको, राज्यातील सर्वांना चांगले दिवस आले पाहिजे, हाच आमचा प्रयत्न आहे.
सामान्यांच्या आयुष्य सोनं करा
सर्वसामान्यांचे आयुष्याचे सोनं करण्याचे आमचे ध्येय आहे. आपण घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले आहेत. कल्याणकारी योजनेनंतर विरोधकांचे चेहरे पांढरे पडले होते. योजनांचा मोठा निर्णय घ्यायचा ठरवला आहे. अर्थसंकल्प मांडतांना त्यांचे चेहरे पाहण्यासारखे आहे. कोणताही नियम मोडला नाही, सरकारचे पैसे हे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. घरात पैसा न्यायचे नाही.
घोषणा करायच्या आणि पैसे आम्ही द्यायचे हे योग्य नाही
आपण शेतकऱ्यांपासून ते महिलांसाठीच्या अनेक योजना केल्या आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात शेतकऱ्यांची जी काही नुकसान भरपाई आहे. त्यात अवकाळी आणि गारपीटमध्ये १५ हजार कोटी दिले. आपण एनडीआरएफचे निर्णय बदलले. दुप्पट केले. दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले. सततच्या पावसामुळे होणारे नुकसान आपण देतो. एक रुपयात पीक विमा देतो. मोदींनी सहा हजार दिले त्यात आपण सहा हजाराची भर दिली. गोगल गायींमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई कधी मिळत नव्हती. ती आपण दिली. महाविकास आघाडीने नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपये भरपाई देण्याची निर्णय घेतला. पण पैसे दिले नाही. आपण दिले. त्यांनी का नाही दिले. घोषणा करायच्या आणि पैसे आम्ही द्यायचे हे योग्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी मंत्र दिला.
काँग्रेसवर फोडले खापर
तुम्ही शेतकऱ्यांना योजना दिल्या असत्या तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. त्याला जबाबदार कोण. काँग्रेसने ५० वर्ष शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. तुम्ही जलयुक्त शिवार योजनाही बंद केली. आम्ही ती सुरू केली. आपण शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. हेलिकॉप्टरने गावाला जाऊ नको तर आठ ते १० तास गाडी चालवत जाऊ. वेळ वाया घालवू. त्या दहा तासात मी दहा हजार फायलींवर सही करेन, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
आमचे कामातून उत्तर
मी आरोपांना उत्तर कामातून देतो. आरोप कितीही करा. आम्हाला विचलीत करू शकत नाही. आमचा फोकस कामावर आहे. लाडक्या भावालाही दिलंय की. त्यांना अप्रेन्टिशिपसाठी पैसे दिलेत. लाडकी बहीणमुळे ती योजना दबली गेली. पण ती व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल. हे भावांबद्दल बोलत आहेत. हे बोलत आहेत. मुंबईतील यांच्या शाखांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बोर्ड लागले आहेत. इकडे घटनाबाह्य मुख्यमंत्री, बेकायदेशीर सरकार म्हणता आणि मुख्यमंत्री योजनेचे बोर्ड लावता. चांगलं आहे. आमचं सरकार देणारं आणि आम्ही देत राहणार आहोत, असे त्यांनी विरोधकांना बजावले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App