या अगोदर राज्यपालांविरोधातही केले होते वादग्रस्त विधान
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : डीएमके नेते शिवाजी कृष्णमूर्ती यांची रविवारी (१८ जून) भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर काही वेळातच त्याच्या अटकेची बातमीही समोर आली. डीएमकेच्या प्रवक्त्याने भाजपा नेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी केली होती. शिवाजी कृष्णमूर्ती यांच्या वक्तव्यानंतर तामिळनाडूत वादाला तोंड फुटले आहे. DMK leader Shivaji Krishnamurthy expelled from the party and arrested for his controversial remarks on BJP leader Khushboo Sundar
एका जाहीर सभेला संबोधित करताना शिवाजी कृष्णमूर्ती यांनी खुशबू सुंदर यांच्यावर भाष्य केले होते. यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
खुशबू सुंदरने DMK चे प्रवक्ते शिवाजी कृष्णमूर्ती यांचा एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे, “या सवयीच्या गुन्हेगाराच्या असभ्य टिप्पण्या DMK मध्ये प्रचलित राजकीय संस्कृती दर्शवतात, कोणालाही महिलेबद्दल असभ्य टिप्पणी करण्याचा अधिकार नाही.” असे खुशबू सुंदर म्हणाल्या आहेत.
काय प्रकरण आहे?
वास्तविक, शिवाजी कृष्णमूर्तींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी खुशबू सुंदरबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. शिवाजी कृष्णमूर्तींनी खुशबू सुंदर यांना जुने भांडे असल्याचे म्हटले होते. याशिवाय, कृष्णमूर्तींनी यापूर्वी राज्यपालांविरोधातही वादग्रस्त वक्तव्य केले होते आणि आता खुशबू सुंदर यांच्यावर केलेली टिप्पणी पूर्णपणे निषेधार्ह आहे, असे भाजपाप्रदेशाध्क्ष के. अण्णामलई यांनी म्हटले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more