जम्मू-काश्मीरमध्ये मोठा घातपात टळला! लष्कराने ११ जिवंत बॉम्बसह ६१ स्फोटके केली नष्ट


लष्कराच्या रोमियो फोर्स आणि पूंछच्या एसओजी पोलिसांनी संयुक्तपणे स्फोटके शोधून काढली.

विशेष प्रतिनिधी

पूंछ : जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी लष्कराने दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. लष्कराच्या पुंछ सेक्टरमधील सेरी चौवाना गावात सुरक्षा दलांना स्फोटकांचा मोठा साठा सापडला. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले आणि सर्व स्फोटके निकामी करण्यात आली. Army destroys 61 explosives including 11 live bombs in Jammu and Kashmir

लष्कराच्या एसओजी टीमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लष्कराच्या रोमियो फोर्स आणि पूंछच्या एसओजी पोलिसांनी संयुक्तपणे स्फोटके शोधून काढली. ज्यामध्ये ११ जिवंत बॉम्बसह एकूण ६१ स्फोटक साहित्य नष्ट करण्यात आले.

सेरी चौवाना गावातूनच सर्व स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके मिळणे हा एक मोठा दहशतवादी कट होता, जो सुरक्षा दलाच्या तत्परतेने हाणून पाडता आला.

जम्मू-काश्मीरमध्ये एजन्सी आणि लष्कराला मिळालेल्या माहितीच्या आधारे, खोऱ्यातील दहशतवाद संपवण्यासाठी सतत ऑपरेशन सुरू आहे. नुकतीच कुपवाडा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने मोठी कारवाई केली होती. ज्या अंतर्गत पाकिस्तानातून कार्यरत असलेला कुख्यात दहशतवादी असमास रिझवान खानची मालमत्ता जप्त करण्यात आली.

Army destroys 61 explosives including 11 live bombs in Jammu and Kashmir

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात