मोदींच्या नाशिक मधल्या कार्यक्रमात अजितदादा गट, भुजबळ अलिप्त राहिल्याची चर्चा; पण प्रत्यक्षात घडलंय काय??

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक मधल्या विविध कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गट अलिप्त राहिला. मंत्री छगन भुजबळ हे मोदींच्या कार्यक्रमाच्या नियोजनांपासून दूर राहिले, अशी चर्चा मराठी माध्यमांनी घडवली.  Discussion of Ajitdada group, Bhujbal staying away from Modi’s program in Nashik

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि आधीचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मध्ये आठवडाभर तळ ठोकून त्यांनी मोदींच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आणि मोदींच्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येऊन सर्व व्यवस्थांचा बारकाईने आढावा घेतला, अशा बातम्या आल्या. त्या वस्तुस्थितीला धरूनच होत्या.

परंतु प्रत्यक्षात नाशिक मधल्या कार्यक्रमात अजित पवारांच्या गटाच्या आमदारांनी आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अलिप्तता दाखवली, ही वस्तुस्थिती नव्हती. उलट छगन भुजबळ यांचा नाशिक मधला राजकीय भूमिकाच घटत चालली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीतले मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या मंत्रिमंडळातले छगन मंत्री छगन भुजबळ यामध्ये कमालीचा फरक आहे. त्यांच्या अधिकारांमध्ये आणि राजकीय महत्त्वामध्ये मोठी घट झाली आहे. त्या उलट भाजपचा आणि शिंदे गटाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

मूळात आता नाशिक मध्ये छगन भुजबळ या नावाला जुने वलयच उरलेले नाही. “भुजबळ बोले आणि नाशिक डोले” हा काळ केव्हाच इतिहासजमा झाला आहे. मग भले नाशिक जिल्ह्यामध्ये भुजबळांच्या बरोबर राष्ट्रवादीचे काही आमदार अजितदादा गटात गेले असतील, पण नाशिकच्या एकूण राजकारणाच्या दृष्टीने विचार करता ते मूळातच आता फारसे प्रभावी उरलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी एखाद्या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याने अथवा ते एखाद्या कार्यक्रमापासून अलिप्त राहिल्याने फारसा फरक पडण्याची बिलकुल शक्यता नव्हती, तसा तो पडला ही नाही.

आजच्या पंतप्रधान मोदींच्या रोड शो मध्ये त्यांच्या शेजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आघाडीवर दिसले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मागे अजित पवार उभे होते आणि पंतप्रधानांच्या मागे भाजपचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उभे होते. बाकी कुठल्याही नेत्याला पंतप्रधानांच्या रोड शोच्या गाडीमध्ये उभे राहण्याला जागाच शिल्लक नव्हती. त्यामुळे छगन भुजबळांनी तिथे उभे राहणे तसेही प्रोटोकॉल मध्ये अपेक्षितच नव्हते.

गोदावरी पूजन आणि काळाराम मंदिरात प्रत्यक्ष पूजा करताना पंतप्रधान एकटेच गाभाऱ्यात होते. तो त्यांच्या नियमित प्रोटोकॉलचाच भाग होता. पंतप्रधान कुठल्याही मंदिरात जाताना शक्यतो एकटेच जातात. तिथल्या राज्याच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांना अथवा मंत्र्यांना ते बरोबर नेतच नाहीत. त्यामुळे नाशिक मधल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान एकटेच होते.

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ व्यासपीठावर होते, पण त्यांची आसने पंतप्रधानांपासून प्रोटोकॉलनुसारच दूर होती. पंतप्रधानांच्या शेजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच आसने होती. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या शेजारी अजित पवारांचे आसन होते. पालकमंत्री म्हणून दादा भुसे पहिल्या रांगेतच होते. भुजबळांचेही आसन पहिल्या रांगेत होते, परंतु ते एका कडेला होते.

पंतप्रधानांच्या नाशिक मधल्या कार्यक्रमात जे घडले, ते पंतप्रधानांच्या प्रोटोकॉल नुसार सध्याच्या नेत्यांच्या राजकीय कमी अधिक महत्त्वानुसारच घडले. त्यामध्ये अजितदादांच्या गटाने अथवा छगन भुजबळांनी नियोजनात असण्याचा किंवा नसण्याचा काहीही फरक पडणार नव्हता आणि तो तसा पडलाही नाही. त्यामुळे “पवारनिष्ठ” माध्यमांनी कितीही भुजबळांच्या अलिप्त राहिल्याच्या किंवा अजितदादा गटाच्या बहिष्कारच्या बातम्या दिल्या, तरी त्या प्रत्यक्षात फोल ठरल्या!!

Discussion of Ajitdada group, Bhujbal staying away from Modi’s program in Nashik

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात