WATCH : दिग्गीराजा म्हणतात गोमांस खाणे चुकीचे नाही, सावरकरांच्या पुस्तकाचा दिला दाखला, उपस्थितांना म्हणाले- हे सगळं भाजप नेत्यांसमोर सांगाल ना?

Digvijay Singh says it is not wrong to eat beef, given the proof of Savarkar's book

Digvijay Singh : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी सांगितले की, विनायक दामोदर सावरकर यांची विचारधारा भाजप आणि संघ पुढे नेत आहेत. गोमांस खाण्यात काहीच गैर नाही असे खुद्द सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. स्वतःच्या विष्ठेमध्ये लोळणारी गाय आपली आई कशी होऊ शकते?, असे खुद्द सावरकरांनीच लिहिले आहे. Digvijay Singh says it is not wrong to eat beef, given the proof of Savarkar’s book


वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी सांगितले की, विनायक दामोदर सावरकर यांची विचारधारा भाजप आणि संघ पुढे नेत आहेत. गोमांस खाण्यात काहीच गैर नाही असे खुद्द सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. स्वतःच्या विष्ठेमध्ये लोळणारी गाय आपली आई कशी होऊ शकते?, असे खुद्द सावरकरांनीच लिहिले आहे.

काँग्रेसने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत आयोजित कार्यक्रमात दिग्विजय सिंह म्हणाले की, स्वतः सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही असे लिहिले आहे. आता आपल्याकडे गोमांस खाणारे अनेक हिंदू आहेत. ते म्हणतात की, गोमांस खाऊ नये असे कोणत्याही पवित्र ग्रंथात लिहिलेले नाही. आमची लढाई संघाशी आहे, ज्यांची विचारधारा देशाचे तुकडे पाडणारी आहे. या कारणास्तव सत्य जाणून घेणे आणि समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

शिव्या देणाऱ्यालाही प्रेमाने बोला

जो शिव्या देतो, त्यालाही प्रेमाना बोला, असा सल्ला दिग्विजय सिंह यांनी कार्यकर्त्यांना दिला. संघटना पुढे न्यावयाची असेल तर अहंकार आणि अभिमान घरी सोडा. राग गिळून चालायला शिका. लोक माझ्यावर टीकाही करतात. बरे-वाईट म्हणतात. मी कधीच आक्षेप घेतला नाही. जो मला शिव्या देतो, ती मी ठेवत नाही. मी व्याजासह परत देतो.

म्हणाले- बजरंग दल गुन्हेगार

बजरंग दलाचे लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला. बजरंग दलाचे लोक धमकी देतात. पैसे गोळा करतात. आश्रमाच्या शुटींगबाबत गदारोळ करणारे लोकही पैसे मागायला गेले. मामूची (शिवराज सिंह चौहान) एक टोळी आहे. हे लोक अवैध वाळू उत्खनन, दलाली करतात. एखाद्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार पकडला तर त्याची बदली होते.

काँग्रेस नेत्यांचा हिंदु व्होट बँकेवर डोळा!

मागच्या काही काळापासून काँग्रेसने आपल्यात आमूलाग्र बदल घडवत हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचे यत्न चालवले आहेत. राहुल गांधींपासून ते अनेक काँग्रेस नेते आता हिंदु-हिंदुत्वाचा जप करू लागले आहेत. बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई या जनताकेंद्रित मुद्द्यांपेक्षा यांनी हिंदु आणि हिंदुत्वाविषयी अधिक प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली आहे. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी अयोध्या निकालावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करताना सावरकरांचा उल्लेख केला होता. हिंदु आणि हिंदुत्व हे वेगळे आहे हे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून चालवला जात आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसने भाजपच्याच धास्तीने आपल्या रणनीतीत असा बदल केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

Digvijay Singh says it is not wrong to eat beef, given the proof of Savarkar’s book

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात