विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपची तुलना जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरशी केली आहे. हिटलरने जर्मनीचा नाश केला तसेच भाजप भारत उद्ध्वस्त करीत आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.Digvijay ingh targets BJP
दिग्विजय यांनी ट्विट केले. त्यांनी सांगितले की, निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. आता भाजपमधील प्रत्येक जण हिंदुत्व धोक्यात आल्याचा दावा करतो आहे आणि ते वाचविण्यासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन करतो आहेत. हिटलर जे करत होता तेच भाजप करीत आहे.
मध्य प्रदेशात तीन ठिकाणी विधानसभेची एक तर एके ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान आहे. निकाल दोन नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशमधील भाजप सरकारचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिग्विजय यांना प्रत्यूत्तर दिले. ते म्हणाले की, द्विग्विजय, काँग्रेस जितक्या संकटात सापडली आहे ते पाहून तुम्ही आधी तुमचे घर सांभाळा. अन्यथा पुढील पावसाळ्यात तुमचे घर वाहून जाईल. हिंदू कोणत्याही धोक्यात नव्हते आणि अजूनही नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App