विशेष प्रतिनिधी
उज्जैन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावरून पाकिस्तानच्या संदर्भात पुन्हा वाद निर्माण झाला आहे. उज्जैनमध्ये काही दिवसांपूर्वी मोहरम मिरवणुकीतील घडामोडीवरून ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्या व्यक्तींनी पाकिस्तान झिंदाबाद नव्हे तर काझीसाहेब झिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या असा दावा त्यांनी केला.Digiraja once again gets in to trouble
दिग्विजय यांनी ट्विट केले. फेक न्यूजमुळे घोषणा बदलण्यात आली. याची दखल घेऊन मध्य प्रदेश पोलिसांनी कारवाई करायला हवी होती. कुणाला अटक होणार असल्यास तशी कारवाई राखून ठेवली जावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.
मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी द्विग्विजय यांच्यावर टीका केली. लांगूलचालनाच्या राजकारणाचा एक भाग म्हणून ते राष्ट्रविरोधी शक्तींना पाठिंबा देत आहेत. त्यांनी अशा व्यक्तींना पाकिस्तानला न्यावे, असे मिश्रा यांनी यांनी सांगितले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
आपले सरकार तालिबानसारखी मनोवृत्ती सहन करणार नाही, असे त्यांनी बजावले.उज्जैनमधील गीता कॉलनी परिसरात रविवारी मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान काही व्यक्तींनी पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर चार जणांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) कडक कारवाई करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App