मैं, योगी आदित्यनाथ गोरखपूरवाला; सोशल मीडियात ट्विटचा धुमाकूळ


वृत्तसंस्था

लखनौ : “मैं, विकास दुबे हूँ, कानपूरवाला” त्याला कानपूरबाहेरच ठोकल्यानंतर सोशल मीडियावर ट्रेंड झाला  मैं, योगी आदित्यनाथ गोरखपूरवाला…!! हा ट्रेंड अजूनही फिरतोय.

मध्यप्रदेशातील उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरातूनत अटक केलेल्या गँगस्टार विकास दुबेचा शुक्रवारी चकमकीत मृत्यू झाला. उज्जैनहुन कानपूरला घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीचा बर्रा परिसरात अपघात झाल्यानंतर घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न त्याने केला. या एन्काऊंटच्या घटनेनंतर “मैं, योगी आदित्यनाथ हूँ गोरखपुरवाला” असे भाजपने टिवट केल्याने माध्यमांसह देशभर या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

या चकमकीत दुबे जखमी झाला आणि त्याला रूग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले होते. अपघातानंतर दुबेने एसटीएफच्या एका जवानाचे पिस्तुल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या पथकाने त्याला घेरले आणि प्रत्युत्तरादाखल गोळीबारात तो जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. जेथे त्याला मृत घोषित केले. वरिष्ठ पोलिस अधीक्षक (कानपूर) दिनेश कुमार पी यांनी ही माहिती दिली. मुसळधार पाऊस सुरू असताना पोलिसांचे वाहन उलटले आणि हा अपघात झाला.

हेच ते वादग्रस्त बनत असलेले ट्विट

या चकमक व अपघातानंतरच्या परिस्थितीबद्दल भाजपचे युपीचे प्रवक्ते डॉ.चंद्र मोहन यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानताना दिसले. “आम्ही सुरक्षित आहोत, योगी येथे आहेत” त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्याचा एक फोटो घेतला आणि ट्विट केले.

फोटोमध्ये मुख्यमंत्री फोनवर बोलत असून त्यावर “मैं योगी आदित्यनाथ हूँ गोरखपूरवाला” असे लिहिल्याचे दिसत आहे. हे ट्विट अशा वेळी आले, जेव्हा विरोधी पक्षांसह अनेक सोशल मिडीया सरकारवर आणि पोलिसांवर बनावट चकमक केल्याचा आरोप करत आहे. ते ट्विट प्रचंड व्हायरल झाले.

याशिवाय डॉ. चंद्रमोहन यांनी “मैं, योगी आदित्यनाथ गोरखपूरवाला” या ट्विटचेच विकास दुबेवर एक नाटक लिहिले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती