Dharmendra Pradhan : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, ‘नायब सैनी हे भाजपचा हरियाणातील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा’

Dharmendra Pradhan

माजी गृहमंत्री अनिल विज यांच्या दाव्यावरही दिली आहे प्रतिक्रिया अन् राहुल गांधींवरही साधला निशाणा


विशेष प्रतिनिधी

कर्नाल : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान  ( Dharmendra Pradhan ) यांनी रविवारी सांगितले की हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात विजयाची ‘हॅटट्रिक’ करेल.

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि हरियाणाचे माजी मंत्री अनिल विज यांनी 5 ऑक्टोबर रोजी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास ते मुख्यमंत्रिपदासाठी दावा करेल. असे वक्तव्य केले असताना, प्रधान यांचे वक्तव्य आले आहे.



विज यांच्या टिप्पण्यांबद्दल विचारले असता, हरियाणा निवडणुकीचे भाजपचे प्रभारी प्रधान यांनी कर्नाल येथे पत्रकारांना सांगितले, “पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्यांनी असे म्हटले असेल, परंतु नायबसिंग सैनी हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत.”

ते म्हणाले की, भाजप हरियाणातील विधानसभा निवडणूक राज्यातील लोकप्रिय नेते सैनी यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. ते म्हणाले, “भाजप हरियाणा विधानसभा निवडणुकीत जिंकून ‘हॅट-ट्रिक’ करेल, असे प्रधान म्हणाले की, आरक्षणाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अलीकडे दिलेले विधान हरियाणा विधानसभा निवडणुकीत “राजकीय मुद्दा” असेल.

त्यांनी दावा केला, “काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, त्यांचा पक्ष सत्तेत आल्यावर आरक्षण संपवेल. ही काही नवीन गोष्ट नाही. त्यांच्या विधानातून त्यांची (काँग्रेसची) मानसिक स्थिती दिसून येते.

Dharmendra Pradhan said Naib Saini is the face of BJP for the Chief Ministership in Haryana

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात