विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad pawar 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी साधारण वर्ष – सहा महिने शरद पवार नियमित टप्प्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून त्यांच्या भेटीगाठी घेत होते. महाराष्ट्रातले ऊस उत्पादक, साखर कारखानदार, बिल्डर लॉबी वगैरेंच्या समस्या घेऊन ते थेट महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना वगळून किंवा त्यांना वळसा घालून पंतप्रधानांना भेटत होते. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्या भेटी आणि पत्रांचा रोख मुख्यमंत्र्यांकडे वळविल्याचे दिसून येत आहे. Sharad pawar writes to CM eknath shinde
शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांची चिंता पवारांना भेडसावते आहे. ती चिंता कानावर घालण्यासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागितली आहे, पण ती वेळ अद्याप मिळालेली नाही, असे शरद पवारांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले आहे. Sharad pawar
शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यापूर्वी दोनदा भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला ऐनवेळी पवारांच्या एका फोनमुळे विरोधी पक्षांमध्ये नेते गैरहजर राहिले होते. परंतु नंतर मनोज जरांगे एपिसोड मुळे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर देखील पवारांनी एकदा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन वाटाघाटी केल्या होत्या. पवारांना आता उद्धव ठाकरे नकोसे झाल्याने ते एकनाथ शिंदे यांच्यावर “राजकीय लाईन” मारत असल्याच्या बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पवारांच्या मुख्यमंत्री भेटीचे समर्थनच केले होते.
Dhangar : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या समस्यांसंदर्भात पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ इच्छित आहेत. पण त्यांनी अद्याप वेळ दिलेली नाही, अशी तक्रार देखील पवारांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर केली आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी वर्ष – सहा महिने आधी पवारांनी घेतलेल्या पंतप्रधानांच्या भेटीसाठी असोत किंवा त्यांना लिहिलेली पत्र असोत, ती ऊस उत्पादक, साखर कारखानदार आणि बिल्डर लॉबीच्या समस्यांसंदर्भात जरी होती, तरी त्या मागच्या राजकीय घडामोडी लपून राहिल्या नाहीत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वळसा घालून त्या भेटी तर होत्याच, पण आपले थेट पंतप्रधानांशी “कनेक्शन” आहे, असे महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांवर आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांवर इम्प्रेशन मारण्याचा तो “डाव” होता. पण प्रत्यक्षात त्यातून फार मोठा राजकीय लाभ पवारांना झाल्याचे दिसले नाही. पवारांचा पक्ष राजकीय डावपेचातून महाराष्ट्रात नंबर 1 वगैरे झाल्याचे चित्र दिसले नाही. Sharad pawar
आता विधानसभा निवडणुकीपूर्वी पवारांनी आपला रोख मुख्यमंत्र्यांच्या दिशेने वळवून त्यांच्यावर “राजकीय लाईन” मारायला सुरुवात केली आहे. यातून उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीला नकोसे झालेत, हा तर सिग्नल आहेच, पण विधानसभा निवडणुकीनंतर नव्या आघाडीत सामील करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मधाचे बोट लावण्याचा देखील हा प्रकार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. Sharad pawar
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more