वृत्तसंस्था
नवी दिल्ली : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, 13 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने झाली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, शुक्रवारच्या नमाजानंतर बडगाममध्ये लोकांनी निदर्शने केली. यावेळी अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.Demonstrations in support of Palestine in Jammu and Kashmir; Slogans against America and Israel
यासंबंधीचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये आंदोलक ‘डाऊन विथ इस्त्रायल’, ‘नारा-ए-तकबीर’, ‘अल्लाह हू अकबर’ अशा घोषणा देताना ऐकू येत आहेत. आंदोलकांच्या हातात पोस्टर आहेत, ज्यामध्ये पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ आणि इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात घोषणा लिहिल्या आहेत. एका पोस्टरमध्ये लिहिले आहे – पॅलेस्टाईन आणि गाझामधील आमच्या बहिणी आणि भावांचे रक्षण करा.
अलीगड मुस्लिम विद्यापीठात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली
यापूर्वी 9 ऑक्टोबरला अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. कॅम्पसमध्ये झालेल्या या रॅलीत सुमारे 400 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये फ्री पॅलेस्टाईन, नारा-ए-तकबीर… अल्ला हु अकबर. ला इलाह इल अल्लाह अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांच्या नावावर एफआयआर नोंदवला आहे.
पॅलेस्टाईनची सुटका करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. तेथे अत्याचार होत आहेत. पॅलेस्टाईन स्वातंत्र्याची मागणी करत आहे, पण त्यांना स्वातंत्र्य दिले जात नाही. एएमयू पॅलेस्टाईनच्या पाठीशी आहे. हे विद्यार्थी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे आहेत. मात्र, या मोर्चाचे नेतृत्व कोणी केले हे स्पष्ट झालेले नाही.
काँग्रेसनेही पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला
9 ऑक्टोबर रोजी पक्षाच्या कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीनंतर काँग्रेसने पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता. बैठकीनंतर काँग्रेसने ठराव मंजूर करून म्हटले की, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धात हजारो लोक मारले गेले आहेत, याचे आम्हाला दु:ख आहे. CWC पॅलेस्टिनी लोकांच्या जमीन, स्व-शासन, स्वाभिमान आणि सन्मानाने जगण्याच्या हक्कांना पाठिंबा देत आहे.
काँग्रेसच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसवर दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा आरोप केला. त्यांनी X वर लिहिले – या भूमिकेने I.N.D.I. महायुतीतील सर्वात मोठा पक्ष देशासमोर उघड झाला आहे. इस्रायलमध्ये निष्पाप लोक आपला जीव गमावत आहेत. काँग्रेस उघडपणे हिंसाचाराच्या पाठीशी उभी असताना देशाचे आणि नागरिकांचे रक्षण कसे करणार?
हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर भारत सरकारने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलला पाठिंबा दिला होता. पीएम मोदी म्हणाले होते की, संकटाच्या या काळात आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App