वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी वाढती आहे. शेजरच्या राज्यांमध्ये शेतातील आगीपासून होणारा धुर यामुळे दिल्लीत जास्त प्रदूषण होत आहे.धुरातील घातक मिश्रणामुळे आणि वाहनातून होणारे उत्सर्जन यामुळे प्रदूषण वाढलेले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न चिंताजनक झाला आहे. दरम्यान, दहा शहरांच्या यादीत भारतातील तब्बल तीन शहरे आहेत जास्त प्रदूषित आहेत. त्यामध्ये राजधानी नवी दिल्लीचा क्रमांक पहिला आहे. या शहरात सर्वात खराब हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकाची नोंद झाली आहे. Delhi ranks first in the world in air pollution; Neighboring states are more responsible for pollution
स्विझर्लड येथील IQAir संस्थेने अभ्यास करून कोणते शहर जास्त प्रदूषित आहे याचे क्रमांक काढले आहेत. या यादीत दिल्लीचा AQI 556 असून ते प्रदूषणात पहिल्या स्थानावर आहे. नंतर कोलकाता चौथ्या आणि मुंबई सहाव्या स्थानावर आहे. सर्वात वाईट AQI निर्देशांक असलेल्या शहरांमध्ये पाकिस्तानमधील लाहोर आणि चीनमधील चेंगडू यांचाही समावेश आहे.
दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेचा अंदाज देणारी आणि प्रदूषणाचे घटक ओळखणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीच्या (IITM) निर्णय समर्थन प्रणाली (DSS) च्या अंदाजानुसार दिल्ली प्रदूषण हे झज्जर, गुरुग्राम, बागपत, गाझियाबाद आणि सोनीपतमधून होत असलेले प्रदूषण आहे.
1. दिल्ली, भारत (AQI: 556)
2. लाहोर, पाकिस्तान (AQI: 354)
3. सोफिया, बल्गेरिया (AQI: 178)
4. कोलकाता, भारत (AQI: 177)
5. झाग्रेब, क्रोएशिया (AQI: 173)
6. मुंबई, भारत (AQI: 169)
7. बेलग्रेड, सर्बिया (AQI: 165)
8. चेंगडू, चीन (AQI: 165)
9. स्कोप्जे, उत्तर मॅसेडोनिया (AQI: 164)
10. क्राको, पोलंड (AQI: 160)
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App