दिल्ली सरकारने प्रदूषण नियंत्रण जाहिरातींवर उडविले 940 कोटी; प्रदूषणाचा ठपका मात्र उडविलेल्या फटाक्यांवर!!


  • प्रत्यक्ष प्रदूषण नियंत्रणाबाबत मात्र “शंख”

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतल्या प्रदूषणाच्या बातम्या दिवाळीच्या ऐन सणामध्ये मोठ्या प्रमाणावर माध्यमांमध्ये येत असताना एका आरटीआय मधून एक धक्कादायक खुलासा बाहेर आला आहे. Delhi government spends Rs 940 crore on pollution control advertisements; Pollution blamed on blown firecrackers !!

दिल्ली सरकारने गेल्या सात वर्षांमध्ये प्रदूषण नियंत्रण हा संबंधीच्या जाहिरातींवर एक – दोन, नव्हे तर तब्बल 940 कोटी रुपये खर्च केले आहेत. पण प्रत्यक्ष प्रदूषण नियंत्रणाबाबत मात्र दोन्ही हातांनी “शंख” वाजविल्याचे दिसत आहे…!!

दिल्लीतील अमित गुप्ता यांनी दिल्ली सरकारकडे माहिती अधिकारात दिल्लीतील प्रदूषणाच्या बाबत दोन नेमके प्रश्न विचारले होते. दिल्ली सरकारने प्रदूषण नियंत्रणाच्या प्रचार-प्रसारासाठी किती खर्च केला? आणि प्रत्यक्ष प्रदूषण नियंत्रणासाठी किती खर्च करुन कोणती उपाययोजना केली? हे ते दोन प्रश्न होते.



त्यांना दिल्ली सरकारच्या माहिती खात्याने उत्तर पाठविले. यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेट यावर 2015 पासून 2021 पर्यंत प्रदूषण नियंत्रण जाहिरातींवर प्रचार-प्रसार यावर 940 कोटी रुपये खर्च केल्याचे उत्तर दिले. प्रत्यक्ष नियंत्रण प्रदूषण नियंत्रणासाठी किती खर्च केला आणि कोणत्या उपाययोजना केल्या?, यावर मात्र दिल्ली सरकारने कोणतेही उत्तर दिले नाही.

अमित गुप्ता यांनी पर्यावरण खात्याकडे देखील या प्रश्नाविषयी पाठपुरावा केला. परंतु पर्यावरण खात्याने हा प्रश्न पुन्हा माहिती खात्याकडे वळवला. त्यावेळी देखील अमित गुप्ता यांना त्याचे उत्तर मिळालेले नाही.

असे असताना दिल्ली सरकारमधील मंत्री दिल्लीतील प्रदूषणासाठी दिवाळीत उडविलेल्या फटाक्यांना जबाबदार धरताना दिसत आहेत. प्रत्यक्षात सरकारने जाहिरात बाजीवर 940 कोटी रुपये उडवले आणि ठपका मात्र उडविलेल्या फटाक्यांवर ठेवताना दिसत आहेत. भाजपचे आयटी सेलचे निमंत्रक अमित मालविय यांनी या संदर्भात टीका केली आहे.

Delhi government spends Rs 940 crore on pollution control advertisements; Pollution blamed on blown firecrackers !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात