दिल्ली पोलिसांना ‘लष्कर ए तोएबा’च्या दहशतवाद्याला पकडण्यात यश

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून अटक


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटेनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्याला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे.Delhi Police succeeded in arresting Lashkar eToiba terrorist

पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्याकडून मोबाईल फोन आणि एक सिमकार्ड जप्त केले आहे. रियाझ अहमद असे आरोपीचे नाव आहे. जो कुपवाडामधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य होता.



अटक करण्यात आलेला आरोपी रियाझ अहमद एलओसीजवळून शस्त्रे आणि दारूगोळा मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होता. तसेच पुढील कारवाई करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जम्मू-काश्मीरच्या संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना दहशतवाद्याला अटक करण्याबाबत कळवले आहे.

आरोपी निवृत्त सैनिक असल्याचे सांगण्यात येत आहे. राजधानी दिल्लीत तो कोणत्या उद्देशाने आला होता, याचा तपास सुरू आहे. सध्या पोलीस अटक केलेल्या दहशतवाद्याची चौकशी करत आहेत. आरोपी रियाझ अहमद खुर्शीद अहमद राथेर आणि गुलाम सरवर राथेर यांच्यासोबत एलओसीच्या पलीकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा मिळविण्याचा कट रचण्यात सामील होता, असे सांगण्यात येत आहे.

Delhi Police succeeded in arresting Lashkar eToiba terrorist

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात