
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महिलांच्या आक्षेपार्ह छायाचित्रप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने गुगल आणि यू ट्यूबला दणका दिला आहे. एका विवाहित महिलेची आक्षेपार्ह छायाचित्रे तसेच व्हिडिओ असणाऱ्या वेबसाईट्स आणि संबंधित लिंक्स हटविण्याबाबत ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने गुगल, युट्यूब आणि दिल्ली पोलिसांना दिले आहेत.Delhi High Court orders Google and YouTube to delete links to offensive photos and videos of women
दिल्लीतील या महिलेने बनावट नावाखाली सुरू असलेल्या पॉर्नाेग्राफिक वेबसाईट्स ब्लॉक करण्याची याचिका दाखल केली होती. अशा साईट्सवरील याचिकाकर्ता महिलेचे आक्षेपार्ह छायाचित्रे, व्हिडिओ ब्लॉक करण्याचे निर्देश गुगलला देण्यात यावे, अशी मागणीही त्यात केली होती.
गुगलची बाजू मांडणाऱ्या अधिवक्ता ममता झा यांनी न्यायालयाला सांगितले, की युट्यूबवरील सर्व संबंधित लिंक हटविण्यात आल्या असून १० चॅनेल्स ब्लॉक करण्यात आले आहेत. याप्रकरणी न्यायालयाने गुगल, युट्यूब, केंद्र सरकार तसेच दिल्ली पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच पुढील सुनावणी १६ सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे.
Delhi High Court orders Google and YouTube to delete links to offensive photos and videos of women
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई-पुणे दीड तासात तर नागपूर- मुंबई अंतर सहा तासांत, हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर चालणार बुलेट ट्रेन
- आकाशावर लक्ष ठेवण्यासाठी हवाई दलाला मिळणार सहा विमाने, अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर
- भाषिक कट्टरता धोकादायक, हिंदी अधिकृत भाषा नसणाऱ्या राज्यांशी केंद्राने साधावा इंग्रजीमध्ये संवाद, मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश
- लस न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पंजाब सरकारचा बडगा, 15 सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश
Array