Delhi Coaching Centre : ‘डेथ चेंबर्स बनले दिल्लीचे कोचिंग सेंटर’, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला बजावली नोटीस

Delhi Coaching Centre

कोचिंग सेंटर्स देशाच्या विविध भागातून येणाऱ्या उमेदवारांच्या जीवाशी खेळत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे Delhi Coaching Centre

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतील राजेंद्र नगर येथील राऊ कोचिंग सेंटरच्या तळघरात तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महानगरपालिकेला (एमसीडी) नोटीसही बजावली आहे. तसेच, सुनावणीदरम्यान न्यायालयाने कोचिंग सेंटर्स डेथ चेंबर बनले आहेत. अशी टिप्पणीही केली.



सुप्रीम कोर्टाने सोमवारी कोचिंग सेंटरमधील सुरक्षेच्या निकषांशी संबंधित मुद्द्याची स्वतःहून दखल घेतली. सुप्रीम कोर्टाने कोचिंग इन्स्टिट्यूटमधील अलीकडच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली ज्यामध्ये तरुण उमेदवारांना जीव गमवावा लागला. तसेच, दिल्ली सरकार आणि एमसीडीला विचारले की आतापर्यंत कोणते सुरक्षेचे नियम ठरवले गेले आहेत. अशी विचारणाही केली.

सुप्रीम कोर्टाने सांगितले की, ही घटना डोळे उघडणारी आहे की कोणत्याही संस्थेने सुरक्षेच्या नियमांचे पालन केल्याशिवाय त्यांना चालवण्याची परवानगी दिली जाऊ नये. कोचिंग सेंटर्स देशाच्या विविध भागातून येणाऱ्या उमेदवारांच्या जीवाशी खेळत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दिल्ली कोचिंग सेंटरमधील मृत्यूची स्वतःहून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली.

Delhi Coaching Centre

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात