अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतील आझादपूर या आशियातील सर्वात मोठ्या घाऊक भाजी मंडईमध्ये आज सायंकाळी भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झाले. सुदैवाने या घटनेत अद्यापपर्यंत तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. Delhi A major fire broke out in Asias largest vegetable market in Azadpur
घटनास्थळी मार्केटच्या शेडला भीषण आग लागली आणि त्यातून आगीच्या ज्वाळा उठताना दिसत होत्या.अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, आगीची माहिती सायंकाळी 5.20 वाजता मिळाली असून अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले.
Pakistan Bomb Blast : बॉम्बस्फोटांनी हादरले पाकिस्तान, काही तासांतच दोन आत्मघातकी हल्ल्यात ६० ठार
टोमॅटो विक्रेत्याच्या दुकानामागील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ही आग लागली आणि ती पसरल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. भाजी मंडईत आग लागल्यानंतर एकच धावपळ उडाली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App