DRDOने तयार केलेले अँटी कोरोना औषध 2DG लॉन्च; रिकव्हरी होणार फास्ट, ऑक्सिजनची गरजही कमी

Defence Minister Rajnath Singh and Union Health Minister Dr Harsh Vardhan release first batch of Anti-COVID drug 2DG developed by DRDO

Anti-COVID drug 2DG : कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी 2DG औषधाच्या रूपाने आणखी एक शस्त्र भारताला मिळाले आहे. सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना डीआरडीओने तयार केलेले अँटी कोरोना औषध 2डीजी सोपवले. यानंतर हे औषध आरोग्यमंत्र्यांच्या वतीने एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांना देण्यात आले. Defence Minister Rajnath Singh and Union Health Minister Dr Harsh Vardhan release first batch of Anti-COVID drug 2DG developed by DRDO


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी 2DG औषधाच्या रूपाने आणखी एक शस्त्र भारताला मिळाले आहे. सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना डीआरडीओने तयार केलेले अँटी कोरोना औषध 2डीजी सोपवले. यानंतर हे औषध आरोग्यमंत्र्यांच्या वतीने एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांना देण्यात आले.

आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात आणि डीआरडीओच्या सहकार्याने हे औषध तयार करण्यात आले आहे. हे भारताचे पहिली पूर्णपणे स्वदेशी औषध असू शकते, जे कोरोना संकटावर मात करण्यात मदत करेल. एवढेच नव्हे, तर या औषधाने कोरोनामधून बरे होण्याचा वेळही कमी होईल, असे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. याव्यतिरिक्त ऑक्सिजनवरील अवलंबित्वही कमी होईल.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, हे औषध केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कोरोनाशी युद्ध करण्यास मदत करेल. हर्षवर्धन म्हणाले, ‘हे औषध केवळ भारतातच नव्हे तर येत्या काळात संपूर्ण जगामध्ये कोरोनाशी लढण्यास मदत करेल. मी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कोरोनाशी झालेल्या लढाईत डीआरडीओने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे आपण पाहिले आहे, असेही आरोग्यमंत्री म्हणाले.

वृत्तसंस्था एएनआयनुसार ही लस पुढील आठवड्यापासून देशभरात उपलब्ध होणार आहे. पहिल्या बॅचमध्ये या औषधाचे 10,000 डोस उपलब्ध करून देण्यात येतील. गतवर्षापासून रेमडेसिव्हिरसहित अनेक औषधांना कोरोनाशी लढण्यात महत्त्वाचे मानण्यात आले आहे. परंतु 2-डीजी असे पहिले औषध आहे जे कोरोनापासून बचावासाठी महत्त्वाचे आहे. ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाने कोरोना रुग्णांवर आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी या औषधाला मान्यता दिली आहे. असे म्हणतात की, या औषधाच्या वापरामुळे ऑक्सिजनची आवश्यकता कमी होईल. यामुळे हे औषध महत्त्वाचे मानले जात आहे.

Defence Minister Rajnath Singh and Union Health Minister Dr Harsh Vardhan release first batch of Anti-COVID drug 2DG developed by DRDO

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात