certificate course in Covid-19 prevention : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत भरमसाट वाढ झाली. महामारीमुळे उभ्या राहिलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कोरोना प्रतिबंध व व्यवस्थापनात प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक तसेच महाराष्ट्राच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलसचिवांना पाठवण्यात आला आहे. Aurangabad Medical college proposes certificate course in Covid-19 prevention
वृत्तसंस्था
औरंगाबाद : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत भरमसाट वाढ झाली. महामारीमुळे उभ्या राहिलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कोरोना प्रतिबंध व व्यवस्थापनात प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक तसेच महाराष्ट्राच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलसचिवांना पाठवण्यात आला आहे.
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. कानन येळीकर यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, हा कोर्स रुग्णालयांना आवश्यक मनुष्यबळ पुरवेल आणि या कोर्समुळे डॉक्टरांना उपचार सुविधांमध्ये सातत्य देण्यास मदत होईल. हा सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम एमबीबीएस, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि दंतचिकित्सा शाखेत देण्यात आला आहे. वास्तविक, सध्या सर्व डॉक्टर कोरोनावरील उपचारांत व्यग्र आहेत.
या कोर्सच्या प्रस्तावात असेही म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या या काळात रुग्णालयांची आणि त्यांच्या व्यवस्थापनाची स्थिती उघड झाली आहे. तथापि, अद्याप हा कोर्स सुरू झालेला नाही. त्यासाठी केवळ प्रस्ताव ठेवण्यात आला असून अशा परिस्थितीत हा कोर्स लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. हा कोर्स सुरू झाल्यास कोरोनावरील प्रतिबंध आणि व्यवस्थापनाबाबत माहिती देणारा अशा प्रकारचा पहिलाच कोर्स असेल.
Aurangabad Medical college proposes certificate course in Covid-19 prevention
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App