वृत्तसंस्था
नवी दिल्ली : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासाठी राज्यातील अनेक आमदार आणि मंत्र्यांनी दिल्लीत येऊन शक्तीप्रदर्शन केले आहे. त्यामुळे नेतृत्वबदलाची चर्चा पुन्हा वाढली आहे. राज्यातील बहुतांश नेते राहुल गांधीना भेटत आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतात त्यावर मुख्यमंत्र्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. Deep crisis in congress govt in Chattisgadh
बघेल यांच्या कार्यकाळाची अडीच वर्षे पूर्ण झाल्यामुळे आपल्याला हे पद मिळावे अशी भूमिका आरोग्य मंत्री त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव यांनी घेतली आहे. ते मंगळवारी राहुल यांना भेटले होते. त्यानंतर बुधवारी संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनाही बघेल व सिंहदेव भेटले.
या दोन नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यात नेतृत्वबदलाची चर्चा आहे. कृषी मंत्री रवींद्र चौबे, वन मंत्री महंमद अकबर हे सुद्धा दिल्लीत आले आहेत.बघेल यांनी शुक्रवारी राहुल यांची भेट घेतली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तुघलक लेन येथील निवासस्थानी ही भेट झाली तेव्हा पक्षाचे छत्तीसगड प्रभारी पन्नालाल पुनिया हे सुद्धा उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App