विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटालिया स्फोटके प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-उल-हिंदच्या टेलिग्रामवरील पोस्टबाबतचा अहवाल सोयीप्रमाणे बदलून सादर करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच दिली होती असा आरोप अहवाल सादर करणाऱ्या सायबर तज्ज्ञाने केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.Decided 3 lakh but Mumbai Police Commissioner Parambir Singh had paid a bribe of Rs 5 lakh, cyber expert alleges
अँटालिया स्फोटके प्रकरणाची जबाबदारी जैश-उल-हिंदने टेलिग्रामवर पोस्ट टाकून स्वीकारली होती. याबाबतचा अहवाल सादर करणाºया सायबर तज्ज्ञाने एनआयए सांगितले की, त्याचा अहवाल प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी प्रकरणाशी संबंधित नाही.
त्यानंतरअहवालात सुधारणा करण्याचे आदेश तत्कालीन मुंबई पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी मला दिले होते. यासाठी तीन लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आले. मात्र, पाच लाख रुपये दिले. त्याने दिलेल्या सेवेसाठी तो इतके पैसे मिळवण्यास पात्र आहे, असे सिंह यांनी म्हटले.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटीनने भरलेली एसयूव्ही सापडली तेव्हा दहशतवादी संघटना जैश-उल-हिंदने त्यांचे सोशल प्लॅटफॉर्म टेलिग्रामवरून त्याची जबाबदारी घेतल्याचे म्हटले जात होते. सायबर सेल तज्ज्ज्ञाने एनआयएला दिलेल्या जबाबानुसार, तो त्याच दिवशी परमवीर सिंह यांना भेटला.
जानेवारी २०२१ मध्ये इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी त्याने दिल्ली पोलिसांना मदत केल्याचे सिंह यांना सांगितले. या स्फोटाची जबाबदारी घेणाऱ्या जैश-उल-हिंदची लिंक दिल्लीमधील तिहार कारागृहाशी आहे. पोस्ट टाकण्यासाठी तिहार कारागृहातला मोबाइल वापरण्यात आल्याचे त्याने सिंग यांना सांगितले. त्यावर सिंह यांनी त्यांच्यासाठी तसा अहवाल लिहिण्यास मला सांगितले आणि त्यांच्या कार्यालयात बसूनच मी अहवाल तयार केला.
अहवाल वाचल्यानंतर सिंह यांनी टेलिग्राम चॅनेलवर जैश-उल-हिंदचे आलेले पोस्टर वापरण्यास सांगितले आणि अँटालिया स्फोटकाची जबाबदारीही त्याच संघटनेने घेतल्याचे नमूद करण्यास सांगितले. त्यानुसार, मी अहवालात सुधारणा केली आणि जैश-उल-हिंदचे नाव टाकून त्यांनी या घटनेची जबाबदारी घेतल्याचे नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App