पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया यांना धमक्या मिळाल्यानंतर आता प्रसिद्ध कथाकार, कवी कुमार विश्वास ( Kumar Vishwas ) यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. कुमार विश्वास यांना कोणीतरी फोन करून जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. या प्रकरणी त्यांच्या मॅनेजरने गाझियाबादमध्ये एफआयआर दाखल केली आहे. धमकीच्या कॉलमध्ये म्हटले आहे की, रामाचे गुणागाण बंद करा. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सध्या डॉ.कुमार विश्वास सिंगापूरमध्ये रामकथा करत आहेत.
कुमार विश्वासच्या व्यवस्थापकाने एफआयआरमध्ये म्हटले आहे की कॉलरने त्याचे नाव उघड केले नाही, त्याऐवजी त्याने कुमार विश्वास यांना मारण्याची धमकी दिली आणि अपशब्द वापरले. कवी कुमार विश्वास हे गाझियाबादच्या वसुंधरा भागात राहतात. फोनवरून धमकी मिळताच त्यांचे व्यवस्थापक प्रवीण पांडे यांनी इंदिरापुरम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
व्यवस्थापक प्रवीण पांडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.02 वाजता माझ्या फोनवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला, त्याने डॉक्टर कुमार विश्वास यांना थेट मारण्याची धमकी दिली . या कॉलने त्यांच्या आणि माझ्या सुरक्षेसाठी चिंता निर्माण केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App