जाणून घ्या, मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
विशेष प्रतिनिधी
हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला ( Bajrang Punia ) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना परदेशी क्रमांकावरून धमकीचा संदेश आला असून त्यांना काँग्रेस सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. काँग्रेस सोडली नाही तर जीवे मारले जाल, असे या धमकीत म्हटले आहे.
बजरंग पुनियाने आरोप केला आहे की, त्याला व्हॉट्सॲपवर परदेशी नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. कुस्तीपटूच्या म्हणण्यानुसार, त्याला मिळालेला धमकीचा मेसेज असा आहे- ‘बजरंग, काँग्रेस सोडा नाहीतर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भले होणार नाही. हा आमचा शेवटचा इशारा आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही काय आहोत ते दाखवून देऊ. तुम्हाला पाहिजे तिथे तक्रार करा, ही आमची पहिली आणि शेवटची चेतावणी आहे.’
या धमकीनंतर बजरंगने सोनीपत बहलगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बजरंग हा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असून तो लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे या धमकीमुळे लोकांमध्ये चिंता आणि संताप निर्माण झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App