पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी अंतिम मुदत 30 जूनपर्यंतच; केंद्राचा इशारा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहे. सरकारी अथवा अर्थिक कामांसाठी त्याचे सादरीकरण करावे लागते. ते आता एकमेकांशी लिंक करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने ३०जूनपर्यंत मुदत दिली आहे. Deadline for linking PAN and Aadhaar cards is June 30

कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च ही मुदत दिली होती. ती आता वाढवून 30 जून केली आहे. सेंट्रल डायरेक्ट टॅक्स बोर्डाने (CBDT) म्हटलं आहे की,जर पॅनकार्ड आधारशी मुदतीत लिंक केले नाही तर ते रद्द होईल. अंतिम मुदत संपल्यानंतर एखाद्या युजरने आपले पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केले तर पॅन कार्ड आधार क्रमांकाच्या सूचनेच्या तारखेपासून कार्यान्वित होईल.



जर युजरने पॅन कार्ड मुदतीनंतर आधार कार्डशी जोडले तर शुल्क घेतले जाणार आहे. नवीन कलमानुसार, जर 1 जुलै 2021 रोजी किंवा त्यानंतर पॅनकार्ड आधारशी जोडले तर त्या व्यक्तीला दंड भरावा लागणार आहे. मात्र,दंडाची ही रक्कम 1000 रुपयांपेक्षा कमी असेल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी पॅनकार्ड आधारकार्डाशी लिंक करुन घ्यावे, असे आवाहन सरकारने केले आहे.

आयकर कायद्यानुसार एखाद्याने 30 जूनपर्यंत पॅनकार्ड आधारकार्डाशी लिंक केले नाही आणि पॅनकार्ड निष्क्रीय किंवा बंद झाले तर अशा व्यक्तीस पॅन संबंधी माहिती सादर करणे आवश्यक असेल. अन्यथा त्यांनी कागदपत्रे सादर केली नाही, माहिती दिली नाही असे समजले जाईल. त्यानंतर संबंधित व्यक्तींवर आयकर कायद्यानुसार कारवाई होईल.

Deadline for linking PAN and Aadhaar cards is June 30; Hint of the center

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात