साईबाबांची मूर्ती हटवून रातोरात मंदिराचा केला दर्गा, उत्तर प्रदेशातील घटना


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात मंदिरातील साईबाबांची मूर्ती हटवून त्याठिकाणी दर्गा बनविण्यात आला. हिरवे झेंडे लावून मंदिराचे स्वरुपच बदलून टाकण्यात आले. यामुळे तणाव निर्माण झाल्यावर पोलीसांनी तातडीने कारवाई करत पुन्हा मंदिराची स्थापना केली.Dargah of the temple at night after removing the idol of Sai Baba, incident in Uttar Pradesh

बुहेरा या गावात नदीजवळ साईबाबांचे मंदिर आणि प्राचीन चबुतरा आहे. बुधवारी रात्री काही समाजकंटकांनी साईबाबांची मूर्ती तेथून हटवून नदीकाठच्या झाडीत फेकून दिले. याठिकाणी हिरव्या रंगाचे झेंडे लावून ही जागा दर्गा असल्याचे सांगायला सुरूवात केली.



सकाळी ग्रामस्थ दर्शनासाठी गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे तणाव निर्मार झाला होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. त्यानंतर पोलीसांच्या देखरेखीखाली मंदिराला पांढरा रंग देण्यता आला. येथील हिरवे झेंडेही काढून टाकण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.

पोलीसांनी ग्रामस्थांनी शांतीचे आवाहन केले आहे.जाणून बुजून कट करून मंदिर हटविण्याचा प्रयत्न केला आहे. साईबाबा यांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश संपूर्ण जगाला दिला. हिंदूप्रमाणेच मुस्लिमही साईबाबांना मानतात. तरीही समाजातील शांती बिघडविण्यासाठी काही समाजकंटकांकडून असे प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Dargah of the temple at night after removing the idol of Sai Baba, incident in Uttar Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात