राष्टीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आपल्या शासकीय निवासातच कोविड केअर सेंटर उघडले आहे. त्यांच्या या नौटंकीवर टीका करत दोन्ही बहिणी एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यांची सेवा का घेत नाही असा प्रश्न भाजपाचे नेते सुशील मोदी यांनी विचारल्यावर तेजस्वी यांची बहिण चांगलीच भडकली. मोदी यांच्या वयाचा विचार न करता त्यांना थोबाड फोडील अशी धमकीही दिली.Criticism of Tejaswi Yadav’s drama, sister threatens Sushil Modi
विशेष प्रतिनिधी
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आपल्या शासकीय निवासातच कोविड केअर सेंटर उघडले आहे. त्यांच्या या नौटंकीवर टीका करत दोन्ही बहिणी एमबीबीएस डॉक्टर आहेत.
त्यांची सेवा का घेत नाही असा प्रश्न भाजपाचे नेते सुशील मोदी यांनी विचारल्यावर तेजस्वी यांची बहिण चांगलीच भडकली. मोदी यांच्या वयाचा विचार न करता त्यांना थोबाड फोडील अशी धमकीही दिली.
तेजस्वी यादव यांनी शासकीय निवासस्थानात सुरू केलेल्या कोविड सेंटरवर लोक प्रश्न विचारत आहेत. त्यांची राजकीय नौटंकी असल्याचा आरोप केला जात आहे. यावर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार सुशील मोदी यांनी निशाणा साधला.
ते म्हणाले, तेजस्वी यांच्या दोन्ही बहिणी एमबीबीएस डॉक्टर आहेत. कोरोनाच्या काळात त्यांची सेवा का घेतली नाही. यावर तेजस्वींची बहिण रोहिणी आचार्य चांगल्याच भडकल्या. त्या म्हणाल्या, तुमचं नशीब चांगलं आहे की मी तेथे नाही.
पण पुन्हा जर माझ्या बहिणींवर काही बोललात तर चांगलेच बुकलून काढेल. पुन्हा माझ्या बहिणींचे नावही घेतले तर थोबाड फोडील. आपल्या प्राध्यापक पत्नीला विचारा की मुलींसंदर्भात कसे बोलायचे असते.
सुशील मोदी म्हणाले होते की, तेजस्वी यादव यांनी शासकीय निवासस्थानात कोविड केअर सेंटर बनविण्यापेक्षा पाटण्यात अनधिकृत पध्दतीने मिळविलेल्या त्यांच्या डझनावारी घरांपैकी एके ठिकाणी बनवायचे होते.
कांति देवी यांना मंत्री बनविण्याच्या बदल्यात दोन मजली घर तेजस्वी यांनी बक्षीस म्हणून घेतले आहे. राबडी देवी यांच्या मालकीचे पाटण्यात दहा फ्लॅट आहेत. त्याठिकाणी रुग्णालय का उभारले नाही? तेजस्वी यांच्या कुटुंबात दोन बहिणी एमबीबीएस डॉक्टर आहेत.
कोरोनाच्या संकटात त्यांची सेवा का घेतली गेली नाही. डॉक्टर नाहीत, वैद्यकीय साधनसामुग्री नाही. केवळ चार खाटा टाकल्या म्हणजे रुग्णालय होत नाही. रुग्णालय सुरू करण्याचे केवळ नाटक केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App