देशातील क्रिप्टो करन्सीची लोकप्रियता धोकादायक- शक्तीकांत दास

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – देशात क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. भारतात क्रिप्टो करन्सीला अद्याप मान्यता मिळालेली नाही. क्रिप्टो करन्सीला मान्यता मिळावी, अशी मागणी होत असताना मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रिप्टो करन्सीच्या कायदेशीर मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुन्हा एकदा वापराबाबत इशारा दिला आहे.Criptocurrency is dangerous says Das



एका कार्यक्रमात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले क्रिप्टो करन्सीने आरबीआयसाठी गंभीर चिंता निर्माण केली आहे. ते म्हणाले की, क्रिप्टो करन्सीच्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

असे अनेक गुंतवणूकदार आहेत ज्यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये एक हजार ते दोन हजार रुपये गुंतवले आहेत. आरबीआयने क्रिप्टो करन्सीबाबत सरकारला एक विस्तृत अहवाल सोपवला आहे. सरकार या अहवालावर सक्रियपणे विचार करत आहे.

आरबीआय क्रिप्टो करन्सीबाबत चिंता व्यक्त करत असतानाही देशात क्रिप्टो करन्सीला पसंती मिळताना दिसत आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक वाढत असल्याने कॉईनडीसीएक्स, कॉईनस्विच कुबेर हे युनिकॉर्नच्या यादीत समाविष्ट झाले.

Cripto currency is dangerous says Das

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात