डाटा गोपनियता आणि क्रिप्टोकरन्सी बिलांचे मुकेश अंबानी यांच्याकडून समर्थन, प्रत्येक राष्ट्राला डिजिटल पायाभूत सुविधा करण्याचा अधिकार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : डाटा आणि डिजिटल पायाभूत सुविधा भारतासोबतच जगातील प्रत्येक राष्ट्रासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक देशाला ही धोरणात्मक डिजिटल पायाभूत सुविधा तयार करण्याचा आणि संरक्षित करण्याचा अधिकार आहे, असे म्हणत रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष आणि प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांनी डाटा गोपनीयता आणि क्रिप्टोकरन्सी बिलांचे समर्थन केले आहे.Mukesh Ambani’s support for data privacy and cryptocurrency bills, the right of every nation to have digital infrastructure

भारत याबाबत दूरदर्शीपणे नियम आणि धोरणे आखत आहे,असेही ते म्हणाले.इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटर्स अथॉरिटीने आयोजित केलेल्या इन्फिनिटी फोरममध्ये ते बोलत होते. भारतातील सर्वात मोठी डाटा कंपनी असलेल्या जिओ नेटवर्कचे मालक असलेले अंबानी म्हणाले, धोरणात्मक डिजिटल पायाभूत सुविधा तयार करण्याचा आणि संरक्षित करण्याचा अधिकार राष्ट्रांना आहे.



डाटा हे नवीन इंधन आहे. प्रत्येक नागरिकाच्या गोपनियतेचे रक्षण केले पाहिजे. देशात आधीपासूनच डिजिटल ओळख असलेले आधार, डिजिटल बँक खाती आणि डिजिटल पेमेंटद्वारे एक उत्तम फ्रेमवर्क बनले आहे. आता डाटा गोपनियता आणि क्रिप्टोकरन्सी बिल सादर केले जात आहे. हे अत्यंत योग्य पाऊल आहे. योग्य धोरणे आणि योग्य नियामक फ्रेमवर्कने डाटा आणि डिजिटल पायाभूत सुविधांचे संरक्षण करायला हवे.

अंबानी म्हणाले, माझा ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर विश्वास आहे आणि हे क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळे आहे. विश्वास-आधारित, न्याय्य समाजासाठी ब्लॉकचेन खूप महत्वाचे आहे. क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्याचे विधेयक कामात असताना, गव्हर्नर शक्तीकांता दास हे अशा लोकांपैकी आहेत ज्यांना असे वाटते की क्रिप्टोकरन्सीला आधार देणारे ब्लॉकचेन तंत्रज्ञान चलनाशिवाय देखील स्वत:च अस्तित्वात असू शकते.

ब्लॉकचेन वापरून आपण कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी अ सुरक्षा, विश्वास, ऑटोमेशन आणि कार्यक्षमता प्रदान करू शकतो. आपल्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या असलेल्या पुरवठा साखळ्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. डिजिटल पायाभूत सुविधा आणि नियामक फ्रेमवर्क तयार करून भारत आता एक अग्रगण्य डिजिटल सोसायटीमध्ये स्वत:चे रूपांतर करण्याच्या मार्गावर आहोत.

डाटा हे नवीन इंधन म्हणजे एका अर्थाने अर्थव्यवस्थेतील तेल असल्याचे सांगून अंबानी म्हणाले, हे नवीन पारंपरिक तेलापेक्षा वेगळे आहे. पारंपारिक तेल फक्त निवडक ठिकाणीच मिळते. काही देशांमध्येच त्याचे साठे असल्याने त्यांच्यापुरतीच संपत्ती निर्माण होते. याउलट, नवीन तेल म्हणजे डाटा सर्वत्र उपलब्ध आहे. प्रत्येकजण हा डाटा तयार करू शकतो आणि वापरू शकतो. डाटामुळे समानतेचे तत्व प्रस्थापित होण्यास मदत होईल.

Mukesh Ambani’s support for data privacy and cryptocurrency bills, the right of every nation to have digital infrastructure

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात