मोठी बातमी! तब्बल १२८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये होतय क्रिकेटचं पुनरागमन

2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दिली मान्यता

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारिणीने लॉस एंजेलिस येथे 2028मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे, याबाबत आज घोषणा करण्यात आली आहे. Cricket is making a comeback in Olympics after 128 years

आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी मुंबईतील कार्यकारी मंडळाच्या दुसऱ्या दिवसाच्या बैठकीनंतर सांगितले की, “अधिका-यांनी बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, स्क्वॅश, लैक्रोस  यासह क्रिकेटला पाच नवीन खेळांमध्ये समाविष्ट करण्याचा आयोजकांचा प्रस्ताव स्वीकरल्या गेला आहे.

या अगोदर १९००साली पॅरीस ऑलिम्पिकमध्ये  क्रिकेटचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता.  त्यानंतर आता पुन्हा एकाद ऑलिम्पिकमध्ये  क्रिकेट खेळाचे पदार्पण होत आहे. खरंतर सर्वच नवीन खेळांना २०२८च्या स्पर्धेत समाविष्ट करून घेण्याअगोदर आयओसी सदस्यांना समोवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदान करणे आवश्यक असणार आहे.

आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख म्हणाले, ”2028च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत आम्ही अजूनही प्रपोजल मोडमध्ये आहोत. सहभागी संघांची संख्या अद्याप स्पष्ट नाही. आम्ही आयसीसीसोबत काम करू. आम्ही कोणत्याही देशाच्या वैयक्तिक क्रिकेट अधिकाऱ्यांसोबत काम करणार नाही. आयसीसीच्या पाठिंब्याने आम्ही क्रिकेटला अधिक लोकप्रिय कसे करता येईल ते पाहू.”

Cricket is making a comeback in Olympics after 128 years

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात