Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी गायींसंदर्भात मोठी टिप्पणी केली आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने गोहत्येतील आरोपी जावेदची जामीन याचिका फेटाळताना ही टिप्पणी केली. न्यायालयाने पुढे म्हटले की, गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले पाहिजे आणि गोरक्षणाला हिंदूंचा मूलभूत अधिकार बनवले पाहिजे. Cow should be declared as national animal, suggested Allahabad High Court to Central Government
वृत्तसंस्था
लखनऊ : अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी गायींसंदर्भात मोठी टिप्पणी केली आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने गोहत्येतील आरोपी जावेदची जामीन याचिका फेटाळताना ही टिप्पणी केली. न्यायालयाने पुढे म्हटले की, गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले पाहिजे आणि गोरक्षणाला हिंदूंचा मूलभूत अधिकार बनवले पाहिजे.
न्यायालयाने म्हटले की, गायीचा आदर करणे आणि तिचे संरक्षण करणे हे प्रत्येक देशवासीयाचे कर्तव्य आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने गोहत्या कायद्याअंतर्गत जावेद नावाच्या व्यक्तीच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना या सूचना दिल्या आहेत.
यापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयानेही गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची सूचना केली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केंद्र सरकारच्या समन्वयाने गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले होते.
न्यायालयाने म्हटले, गाय भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. संसद जो काही कायदा करेल, सरकारने त्याची काटेकोर अंमलबजावणीही केली पाहिजे. गायींकडे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून पाहू नये, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. गायीची पूजा केली तरच देश समृद्ध होईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले की, गायींचा आदर करणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येक देशवासीयाचे कर्तव्य आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने गोहत्या कायद्याअंतर्गत अटक केलेल्या जावेद नावाच्या व्यक्तीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना ही सूचना केली. या प्रकरणात न्यायालयाने आरोपी जावेदचा जामीन अर्ज फेटाळला.
Cow should be declared as national animal, suggested Allahabad High Court to Central Government
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App