No GST On Papad : पापडाचे नाव अथवा आकार काहीही असो, जीएसटी नाहीच… उद्योगपती हर्ष गोयंकांना अर्थ मंत्रालयाने स्पष्टीकरणवजा फटकारले

No GST on papad, irrespective of shape Tax body corrects Harsh Goenka on Twitter

No GST on papad :  गोल पापडावर जीसएसटी लागतो, चौकोनी पापडावर नाही, असे माहिती देणाऱ्या उद्योगपती हर्ष गोयनका यांच्या ट्वीटवर सीबीआयसीने स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणावर सोशल मीडियावर खूप विनोद केले जात आहेत. No GST on papad, irrespective of shape Tax body corrects Harsh Goenka on Twitter


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गोल पापडावर जीसएसटी लागतो, चौकोनी पापडावर नाही, असे माहिती देणाऱ्या उद्योगपती हर्ष गोयनका यांच्या ट्वीटवर सीबीआयसीने स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणावर सोशल मीडियावर खूप विनोद केले जात आहेत.

उद्योगपती हर्ष गोयनका यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये म्हटले की, “तुम्हाला माहिती आहे का की गोल पापडाला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे, तर चौकोनी पापड जीएसटी लागतो. कोणी चांगल्या चार्टर्ड अकाउंटंटचे नाव सुचवू शकेल का, जेणेकरून मला यामागचा तर्क समजून येईल?

CBIC ने हे उत्तर दिले

हर्ष गोयनका यांच्या ट्विटला उत्तर देताना, सीबीआयसीने म्हटले की, “जीएसटी अधिसूचना क्रमांक 2/2017-सीटी (आर) द्वारे कोणत्याही स्वरूपातील पापडाला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. ही सूचना http://cbic.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.”

अनेक युजर्स म्हणाले होते फेक

विशेष म्हणजे हर्ष गोयनका यांच्या ट्विटनंतर लगेचच अनेक युजर्सनी ते बनावट असल्याचे म्हटले होते. काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या अॅथॉर्सी ऑफ अॅडव्हान्स रुलिंगज ​​(जीएएआर) नेही आपल्या एका आदेशात स्पष्ट केले होते की, कोणत्याही आकार आणि आकृतीच्या पापडावर कोणताही जीएसटी आकारला जाणार नाही.

अलीकडेच, गुजरातच्या जीएसटी अथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलींग्ज (एएआर-गुजरात) कडून लस्सी आणि फ्लेव्हर्ड मिल्कवरील जीएसटीबाबत एक मनोरंजक आदेश आला आहे. एएआर-गुजरातन म्हटले की, लस्सी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) पासून मुक्त आहे. दुसरीकडे, न्यायालयाने म्हटले आहे की, फ्लेव्हर्ड मिल्कवर जीएसटी आकारला जात राहील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की लस्सी आणि फ्लेव्हर्ड मिल्क हे दोन्ही दुधापासून बनवलेले पदार्थ आहेत, परंतु दोघांच्या बाबतीत कर नियम वेगळे आहेत.

नुकतेच असेच एक मनोरंजक प्रकरण समोर आले होते, ज्यात होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या होस्टेल फीवर जीएसटी लागेल की नाही. मग महाराष्ट्राच्या AAGRने आदेश दिला की, जर एक दिवसाचे भाडे 1,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर कोणतेही हॉटेल, inn, गेस्टहाऊस, क्लब किंवा कॅम्पसाईट (निवासी हेतूंसाठी) GST मधून मुक्त आहेत. हाच नियम होस्टेलमधील खोल्यांनाही लागू होतो.

No GST on papad, irrespective of shape Tax body corrects Harsh Goenka on Twitter

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात