शरण या किंवा मरायला तयार व्हा, तालिबानने अनेकांच्या घरांच्या दारावर लावली धमकी देणारी पत्रे

वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानात पकड भक्कम करण्यासाठी तालिबानने अमेरिकी सैन्याला मदत केलेल्या नागरिकांच्या दारांवर, शरण या किंवा मरा, अशा धमक्या देणारी पत्रे चिकटवली आहेत. Taliban targets common peoples

तालिबान्यांनी घरोघरी झडती घेण्याचे सत्र याआधीच सुरु केले होते. आता घराच्या दारावर पत्र चिकटविली जात आहेत. तालिबानने आमंत्रित केलेल्या न्यायालयासमोर हजर व्हावे, तेथे तुमच्या शिक्षेचे स्वरूप जाहीर केले जाईल. तेथे हजर राहिला नाहीत तर त्याची परिणती मृत्युदंडात होईल, अशी धमकी देणारा संदेश या पत्रांत आहे.याआधी सत्ता बळकावली तेव्हा तालिबानने असे दडपशाहीचे धोरण अवलंबिले होते. तेव्हा ते मर्यादेत झाले होते, पण आता शहरा-शहरांत ते राबविले जात आहे. अनेक शहरांत हा प्रकार घडत असल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अनेक देशांनी नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम राबविली. आपल्या देशाशिवाय मदत केलेल्या आणि गरज असलेल्या अधिकाधिक अफगाण नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात आले. यानंतरही ज्यांना अफगाणिस्तानात थांबणे भाग पडले त्यांच्यावर भयंकर स्थिती ओढवेल हे स्पष्ट झाले.

Taliban targets common peoples

महत्त्वाच्या बातम्या