Naseeruddin Shah Video : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना लक्ष्य केले आहे. त्यांनी बुधवारी एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी हिंदुस्थानी इस्लाम आणि उर्वरित जगातील इस्लाममधील फरक सांगितला आहे. Naseeruddin Shah Video On Indian Muslim Community Over Afghanistan Under Taliban Control
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना लक्ष्य केले आहे. त्यांनी बुधवारी एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी हिंदुस्थानी इस्लाम आणि उर्वरित जगातील इस्लाममधील फरक सांगितला आहे.
शहा यांनी प्रश्न विचारला आहे की, तालिबानचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना त्यांच्या धर्मामध्ये सुधारणा करायची आहे की त्यांना गत शतकांतील रानटीपणाने जगायचे आहे? शहा म्हणाले, ‘हिंदुस्थानी इस्लाम जगभरातील इस्लामपेक्षा नेहमीच वेगळा (मुख्तलिफ) राहिला आहे, आणि खुदाने अशी वेळ आणू नये की, तो इतका बदलेल की आपण त्याला ओळखूही शकणार नाहीत.’
उर्दूमध्ये रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओ क्लिपमध्ये शहा यांनी म्हटले आहे की, “अफगाणिस्तानात तालिबानचे सत्तेत पुनरागमन हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय असला तरी भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गाकडून या बर्बरतेचा उत्सव कमी धोकादायक नाही.”
View this post on Instagram A post shared by The Maharashtra News (@the_maharashtranews)
A post shared by The Maharashtra News (@the_maharashtranews)
ते पुढे म्हणाले, ‘प्रत्येक भारतीय मुसलमानाने स्वतःला विचारले पाहिजे की त्याला त्याच्या धर्मामध्ये रिफॉर्म (सुधारणा), जिद्दत-पसंदी (आधुनिकता, नावीन्य) हवे आहे की, त्याला गेल्या शतकातील रानटीपणा हवा आहे. मी एक हिंदुस्तानी मुस्लिम आहे आणि मिर्झा गालिबने फार पूर्वी म्हटल्याप्रमाणे, माझ्या देवाशी माझा संबंध अनौपचारिक आहे. मला राजकीय धर्माची गरज नाही.
Naseeruddin Shah Video On Indian Muslim Community Over Afghanistan Under Taliban Control
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App