कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानंतरच वाढवले, आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

covishield two doses interval, health ministry says decision totaly on scientific basis

covishield two doses interval : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोरोनावरील लस कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील अंतर 6-8 आठवड्यांपासून ते 12-16 आठवड्यांपर्यंत वाढवण्यामुळे तज्ज्ञांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, हा निर्णय पूर्णपणे वैज्ञानिक आधारावर आणि लसीकरणाबाबत राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या सर्व सदस्यांच्या संमतीने घेण्यात आला आहे. covishield two doses interval, health ministry says decision totaly on scientific basis


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोरोनावरील लस कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील अंतर 6-8 आठवड्यांपासून ते 12-16 आठवड्यांपर्यंत वाढवण्यामुळे तज्ज्ञांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, हा निर्णय पूर्णपणे वैज्ञानिक आधारावर आणि लसीकरणाबाबत राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या सर्व सदस्यांच्या संमतीने घेण्यात आला आहे.

मंत्रालयाने म्हटले की, हे अंतर वाढविण्याचा निर्णय अ‍ॅडेनो वेक्टर लसीच्या वर्तनाशी संबंधित वैज्ञानिक कारणांवर आधारित आहे. लसीकरणाच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड -19 वर्किंग ग्रुप आणि स्थायी तांत्रिक सब कमिटी (एसटीएससी) च्या बैठकीत सदस्यांसह वैज्ञानिक आधारावर आणि आकडेवारीवर संपूर्ण चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.

कोविड-19 लसीकरणाच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहाची 22 वी बैठक १० मे रोजी झाली. डॉ. एनके अरोरा, डॉ. राकेश अग्रवाल, डॉ. गगनदीप कांग, डॉ. अमूल्य पांडा, डॉ. जेपी मुलिली, डॉ. नवीन खन्ना, डॉ. व्हीजी सोमाणी आणि डॉ. प्रदीप हल्दरी यात सामील हाते. यूनायटेड किंगडम (यूके) च्या रिअल लाइफ एव्हिडन्सच्या आधारे समितीने कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसदरम्यान अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आणि वैज्ञानिक आधारावर एकमत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.

covishield two doses interval, health ministry says decision totaly on scientific basis

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात