वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राकेशकुमार जैन यांची नियुक्ती केली आहे. येथे ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारामध्ये आठजणांचा मृत्यू झाला होता. Court will watch on lakimpur incedent enqiry
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. सूर्यकांत आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी राज्य सरकारने एसआयटीसाठी तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांची देखील सूचना केली होती. हे सगळे अधिकारी आता एसआयटीचा भाग असतील. आजच्या सुनावणीवेळी खंडपीठाने सांगितले की, ” आम्ही यासंदर्भात न्यायाधीशांसोबत संपर्क साधला असून आता पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राकेशकुमार जैन सध्या एसआयटी करत असलेल्या चौकशीवर देखरेख ठेवतील. या चौकशी प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता राहावी म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App