इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमईआर) कोरोना विषाणूच्या संसर्गाची खातरजमा करण्यासाठी आता घरीच कोरोना चाचणी करता येणार आहे. पुण्यातील माय लॅबच्या किटला मंजुरी देण्यात आलीय. या चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्यांना कोरोनाबाधित समजले जाणार आहे. त्यांना पुन्हा चाचणी घेण्याची आवश्यकता नाही.Corona testing can be done at home
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमईआर) कोरोना विषाणूच्या संसर्गाची खातरजमा करण्यासाठी आता घरीच कोरोना चाचणी करता येणार आहे.
पुण्यातील माय लॅबच्या किटला मंजुरी देण्यात आलीय. या चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्यांना कोरोनाबाधित समजले जाणार आहे. त्यांना पुन्हा चाचणी घेण्याची आवश्यकता नाही.
रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये आता नागरिकांसाठीही मोफत कोरोना चाचणी आणि उपचार
रॅपिड अँटिजन टेस्ट किटसंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्यात. पुण्यातील माय लॅब कंपनीनं घरच्या घरी कोरोना चाचणी करण्याचं किट तयार केले होते. अशा प्रकारचे किट दुसऱ्या देशांत आधीपासूनच वापरले जात आहेत.
घरच्या घरी चाचणी करण्यासाठी माय लॅबचे मोबाईल अॅप डाऊनलोड करावं लागेल, त्यानंतर त्यावर फोटो अपलोड करावा लागेल. फोटो अपलोड केल्यानंतर रिपोर्ट येणार आहे.
त्यात तुम्ही पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह हे समजणार आहे. परंतु जे लोक निगेटिव्ह आढळत आहे, त्या व्यक्तींची आरपीटीसीआर चाचणी होणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App