विशेष प्रतिनिधी
पाटणा – उत्तर प्रदेशाला लागून असलेल्या जिल्ह्यांतील मुलांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश बिहार सरकारने दिले आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यात राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशमुळे बिहारमध्येही कोरोना व डेंगीचा साथ पसरण्याची भिती बिहारला वाटत आहे. त्यामुळे हा उपया योजला असून त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. Corona spreading in Bihar from UP
पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत डेंगीचा प्रसार झाला आहे. तसेच तीव तापामुळे अनेक मुले आजारी आहेत. आतापर्यंत ५० हून अधिक मुलांचा त्यात मृत्यूही झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज विविध तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असले, तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
तीव्र ताप आणि खोकल्याचा त्रास असल्याने दोन मुलांना येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले आहे. या दोन्ही मुलांचे नमुने पुण्यात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
बिहारमधील सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु, काही खासगी शाळा वगळल्या तर इतर कोणत्याही शाळांत कोरोनासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.
Corona spreading in Bihar from UP
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App