Bihar Election Results 2020 : काँग्रेस-आरजेडीला लाडू पचणार नाहीत; शाहनवाज हुसैन यांची टीका


विशेष प्रतिनिधी 

बिहार : बिहारमध्ये निकालापूर्वीच नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी निकालापूर्वीच महाआघाडीवर जोरदार टीका केली. “महाआघाडीच्या लोकांनी आणखी थोडावेळ आनंद साजरा करून घ्यावा. कारण बिहारची जनता त्यांना स्वीकार करणार नाही. त्यांना लाडू पचणार नाहीत,” अशा शब्दांत शाहनवाज हुसैन यांनी महागठबंधनची खिल्ली उडवली आहे.

Bihar Election Results 2020

महाआघाडीकडून लाडू बनवले जात असल्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. महाआघाडीचे लोकंच ते लाडू खाऊन टाकतील. त्यांना ते लाडू पचणारही नाहीत. बिहारची जनता महाआघाडीला कधीही स्वीकारू शकत नाही. बिहारच्या लोकांनी आरजेडीचे शासन पाहिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Bihar Election Results 2020

“बिहारमध्ये आमचंच सरकार सत्तेत येईल,” असा दावा यावेळी शाहनवाज हुसैन यांनी केला. “मतमोजणी सुरू झाल्यानंतर सर्वांना याचं उत्तर मिळेलच. यावेळी बिहारमध्ये आमचा विजय होईल आणि महाआघाडीचा पराभव,” असा दावाही त्यांनी केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था