वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये सांडपाण्यात कोरोनाचे विषाणू आढळल्याने नागरिकामध्ये भीती निर्माण झाली आहे. या बाबीला संशोधकांनीही पुष्टी दिली आहे. Corona is also spread through water?
लखनौतील विविध ठिकाणाहून सांडपाणी चाचणीसाठी गोळा केले होते. ज्यामध्ये खदरा, मछली मोहल्ला आणि घंटाघर येथील सांडपाण्याचे नमुने घेतले होते. त्यापैकी रुद्रपूर खद्रातील पाण्यात कोरोना विषाणू आढळले आहेत.
मात्र यातून कोरोनाचा फैलाव होणार की नाही होणार हा संशोधनाचा विषय आहे, अशी माहिती एसजीपीजीआयच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. उज्ज्वला घोषाल यांनी दिली.
डॉ. उज्ज्वला घोषाल यांनी नमुन्यांचा अहवाल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला सादर केला. कोरोनाबाधित लोकांच्या विष्ठेतून कोरोना विषाणू सांडपाण्याच्या मिसळत आहे. दरम्यान, सांडपाण्याच्या नमुन्यांच्या चाचणीसाठी देशभरात 8 सेंटर्स तयार केली आहेत. यापैकी एक सेंटर लखनौ एसजीपीजीआय आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App