वृत्तसंस्था
बीजिंग : चीनमध्ये पर्यटकांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचे वृत्त असून शेकडो विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अनेक शाळांना संसर्ग रोखण्यासाठी टाळे ठोकण्यात आले आहेत. Corona infection to tourists in China; Hundreds of flights canceled, schools closed
चीनमध्ये अनेक पर्यटकांना कोरोना झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. विमाने, शाळा बंद करण्याबरोबर कोरोनाच्या चाचण्यांना वेग आला आहे. पर्यटकांच्या एका गटाला कोरोनाची लागण झाल्याने चीन भयभीत झाला असून संक्रमण वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. चीनच्या उत्तर आणि वायव्य भागात कोरोना संक्रमण वाढत आहे. गेल्या पाच दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे तेथे निर्बंध कडक केले आहेत. पर्यटकांच्या गटातील एक वृद्ध जोडप्याला प्रथम कोरोनाची लग्न झाली. त्यानंतर १२ जणांना कोरोनाचे संक्रमण झाले. त्यातून ते फैलावत गेल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App