सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची भरपाई मिळवण्यासाठी खोट्या दाव्यांची चौकशी करण्याची परवानगी दिली. बनावट दाव्यांची पडताळणी करण्यासाठी नमुना सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका केंद्राने दाखल केली होती.Corona death scandal Supreme Court orders false claims of compensation, probe to begin in 4 states
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची भरपाई मिळवण्यासाठी खोट्या दाव्यांची चौकशी करण्याची परवानगी दिली. बनावट दाव्यांची पडताळणी करण्यासाठी नमुना सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका केंद्राने दाखल केली होती.
न्यायालयाने म्हटले आहे की, केंद्र सरकार आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ या चार राज्यांमधील 5% दाव्यांची चौकशी करू शकते. या चार राज्यांतील दावे आणि मृत्यू यांच्यात मोठी तफावत असल्याचे मानले जात आहे.
याशिवाय सुप्रीम कोर्टाने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूसाठी भरपाईचा दावा करण्यासाठी कालमर्यादाही निश्चित केली आहे. आता 28 मार्चपर्यंतच्या मृत्यूची भरपाई मागण्यासाठी 60 दिवस आणि भविष्यातील मृत्यूची भरपाई मिळण्यासाठी 90 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टाने कोरोना मृत्यूच्या दाव्यांच्या ‘बनावट रॅकेट’च्या चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती केंद्र सरकारने न्यायालयाला केली. हे सर्व घोटाळे अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचा सरकारचा विश्वास आहे, जे बेकायदेशीरपणे कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची भरपाई हडप करत आहेत. याशिवाय अनेक डॉक्टर बनावट प्रमाणपत्रेही देत आहेत.
आमच्या आदेशाचा गैरवापर होईल असे आम्हाला वाटले नव्हते : न्यायालय
14 मार्च रोजी झालेल्या मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले होते की, आमच्या आदेशाचा गैरवापर होऊ शकतो, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. न्यायालयाने केंद्र सरकारला बनावट दाव्यांच्या चौकशीसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली. तसेच शोक व्यक्त केला. दरम्यान, केंद्राने न्यायालयाला माहिती दिली की, कोरोनामुळे मृत्यूची अधिकृत आकडेवारी आणि भरपाईसाठी दाखल केलेले अर्ज यामध्ये मोठी तफावत आहे.
प्रमाणपत्रावर मृत्यूचे कारण कोरोना नसले तरी भरपाई
न्यायालयाने 4 ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांना 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. ही रक्कम राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून देण्यात येणार होती. मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूचे कारण कोरोना असे लिहिलेले नाही या आधारावर कोणतेही राज्य नुकसान भरपाई नाकारणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.
भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 5.16 लाखांहून अधिक मृत्यूची नोंद
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, महामारी सुरू झाल्यापासून भारतात 5.16 लाखांहून अधिक कोविड-संबंधित मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळमध्ये 2.36 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App