यवतमाळ जिल्हा बँकेच्या तक्रारींची विशेष लेखापरीक्षकांकडून चौकशी ;बाळासाहेब पाटील यांची माहिती


विशेष प्रतिनिधी

 मुंबई : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पाटण शाखेतील तक्रारीबाबत जिल्हा विशेष लेखापरीक्षकांकडून चौकशी सुरु आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. Special Auditor inquires into the complaints of Yavatmal District Bank Information of Balasaheb Patil

विधानसभा सदस्य संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, पाटण शाखेच्या व्यवस्थापकांनी १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्यवहाराची सादर केलेली  माहिती  आणि प्रत्यक्षातील माहिती यामध्ये तफावत आढळली. बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पाटण शाखेला भेट देऊन अहवाल बॅंकेला सादर केला. या शाखेत अनियमितता आढळल्याचे अहवालात निदर्शनास आले.

बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकांची बदली करण्यात आली तर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या पत्राच्या अनुषंगाने सखोल चौकशीचे आदेश दिले. संबंधित शाखा व्यवस्थापकाला बॅंकेने निलंबित केले आहे, असे पाटील यांनी उत्तरात नमूद केले.

Special Auditor inquires into the complaints of Yavatmal District Bank Information of Balasaheb Patil

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण