विशेष प्रतिनिधी
लखनौ : कांशीरामांच्या राजकीय वारसावर डल्ला; मायावती राहिल्या बाजूला काँग्रेसच काढणार दलित गौरव यात्रा!!, असे आता उत्तर प्रदेशात घडणार आहे. Congress will take out Dalit Gaurav Yatra in Uttar Pradesh
महाराष्ट्रात सुप्रिया सुळे या बाळासाहेब ठाकरे यांचे वारंवार नाव घेऊन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा सामाईक राजकीय वारसा आपल्याकडे खेचण्याच्या बेतात आहेतच, तर तिकडे उत्तर प्रदेशात कांशीराम यांचा राजकीय वारसा मायावती यांच्याकडून हिरावून घेऊन काँग्रेसच दलित गौरव यात्रा काढणार आहे.
9 ऑक्टोबर रोजी कांशीराम यांची पुण्यतिथी आहे. त्या दिवसापासून 26 नोव्हेंबर संविधान दिवसापर्यंत ही दलित गौरव यात्रा काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तर प्रदेश मधल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये काढतील. यामध्ये काँग्रेसचा दलित कनेक्ट वाढविण्याचा विचार आहे.
पण त्या पलीकडे जाऊन काँग्रेस शून्यातून आता स्वतःचा विस्तार करण्यासाठी मायावतींच्या व्होट बँकेवर नजर ठेवून आहे. मायावतींचे उत्तर प्रदेशात राजकारण सध्या घसरले आहे. त्यामुळे त्यांची व्होट बँक आपल्याकडे ओढून काँग्रेसला पुनरुज्जीवन देण्याचा मनसूबा हायकमांडने आखला आहे. मायावतींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि “इंडिया” आघाडी यांच्यापासून समान अंतर राखले आहे. कांशीराम यांच्या नावाने दलित गौरव यात्रा काढली, तर कदाचित मायावती “इंडिया” आघाडीतही येऊ शकतील, असा काँग्रेस हायकमांडचा होरा आहे. पण त्या आल्या किंवा नाही आल्या तरी काँग्रेस कांशीराम यांच्या नावाने दलित गौरव यात्रा काढणारच आहे.
या निमित्ताने काँग्रेसचे दलित कार्यकर्ते चार्ज करून त्यांना वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये काम देण्याचाही काँग्रेसचा प्रयत्न आहे. कांशीराम यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत जितनी संख्या भारी, उतनी हिस्सेदारी!! अशी घोषणा दिली होती. त्याच घोषणाची पुनरावृत्ती काँग्रेसने कर्नाटकात “जितनी आबादी, उतना हक” अशी घोषणा देऊन केली होती. आता थेट कांशीराम यांचाच राजकीय वारसा मायावती यांच्याकडून काढून घेऊन तो आपल्याकडे ओढत काँग्रेस उत्तर प्रदेशात पुन्हा पायरोवा करण्याचा प्रयत्न करणार आहे.
उत्तर प्रदेशातील ब्राह्मण, ठाकूर, मुस्लिम आणि दलित ही काँग्रेसची मूळ व्होट बँक होती. ती टप्प्याटप्प्याने घटत गेली. दलित व्होट बँक आणि त्यानंतर ब्राह्मण व्होट बँकेवर मायावतींनी कब्जा केला. त्यामुळे काँग्रेस उत्तर प्रदेशात अक्षरश: शून्य अवस्थेत पोहोचली. आता त्याच अवस्थेतून काँग्रेसला बाहेर काढण्यासाठी कांशीराम यांच्या नावाने दलित गौरव यात्रा काढून त्यांचा वारसा फक्त बहुजन समाज पक्षापुरता मर्यादित नाही, तर तो बहुजन राजकारणा एवढा विशाल आहे, असे दाखविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
पण या सगळ्या प्रकारात खुद्द काँग्रेसकडे पूर्वी असलेल्या जगजीवन राम यांच्यासारख्या दलित नेतृत्वाकडे आणि विद्यमान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारख्या दलित नेतृत्वाकडे मात्र त्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App